शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

खैरे धरणाच्या दुरु स्तीचा मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 02:52 IST

डिसेंबरपासून धरणातील पाणीपुरवठा बंद : महाड तालुक्यातील १९ गावे, २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना बसणार टंचाईची झळ

सिकंदर अनवारे

दासगाव : महाड तालुक्यातील खैरे धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती आहे. शिवाय येथील जलशुद्धीकरण यंत्रणाही कालबाह्य झाल्याने दुरुस्तीची गरज आहे. लवकरच धरणाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असून, त्यासाठी धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा डिसेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेली १९ गावे व २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील खैरे धरणाला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. शिवाय, या धरणातून पाणीपुरवठा होत असलेली यंत्रणाही नादुरु स्त झाली आहे. यामुळे ऐनपावसाळ्यात परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता.गळतीमुळे पाणी वाया जातेच, शिवाय वेळेत दुरुस्ती न झाल्यास संपूर्ण धरणालाच धोका निर्माण झाला होता. २१० मीटर लांबीच्या धरणातील १२० मीटर भाग नादुरुस्त झाला आहे. लघु पाटबंधारे विभागाकडून धरणाची दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्तीसाठी धरणातील पाणी सोडावे लागणार आहे. त्यानंतरच ही दुरुस्ती शक्य होणार आहे.धरणातील पाण्यावर सिंचन क्षेत्र कमी असले तरी १९ गावे व २९ वाड्यांतील ११ हजार ग्रामस्थांना याच धरणातून पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा बंद झाल्यास येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला याबाबत पत्रव्यवहार करून पूर्वसूचना दिली आहे.धरण पाटबंधारे विभागाचे असून, त्यावरील पाणीयोजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आहेत. पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींना पाण्याचे स्रोत माहिती देण्याबाबत लेखी कळविले आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत लोकसंख्या व गुरांची संख्या याची माहिती तत्काळ मागितली आहे. याआधारे या दोन्ही विभागांना पाण्यासाठी पुढील नियोजन करणे सोपे होणार आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी अन्यत्र अडवून पाण्याचे नियोजन करता येईल का, याचाही विचार केला जात आहे.

खाडीपट्टा विभागात खैरे गावाजवळ हे धरण बांधण्यात आले आहे. धरणात केल्या जाणाऱ्या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी केला जाणार होता. मात्र, या भागातील शेती प्रदूषित पाण्याने बाधित झाल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली, यामुळे या पाण्याचा वापर आता पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे. धरणात जवळपास १.७९ द.ल.घ.मी इतका पाणी साठा आहे. गोमेंडी, वराठी, चिंभावे, चिंभावे मोहल्ला, सुतारकोंड, बेबलघर, तेलंगे, तेलंगे मोहल्ला, ओवळे, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, वलंग. रोहन, जुई, कुंबळे, रावढळ, कोसबी, लोअर तुडील व वामने या गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. धरणातून दररोज सहा लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो.धरणा परिसरातील १२० मीटर लांब व १२ मीटर खोल क्षेत्रात गळती असल्याने देखभाल दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. याचा फायदा भविष्यात ग्रामस्थांनाच होईल.- प्रकाश पोळ, शाखा अभियंता,ल.पा. विभाग, महाडधरणाच्या दुरुस्तीमुळे अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद होणार असल्याबाबतची माहिती ग्रामपंचायतींना दिली आहे. येथील नियोजनाची माहितीही मागविण्यात आली आहे.- जे. एन. पाटील, उपअभियंता,ग्रा.पा. पुरवठा विभाग, महाडधरणाच्या पाण्यावर आम्ही भाजीपाला करतो, पाणी बंद झाल्यास शेतीला पाणी मिळणार नाही आणि पीक आले नाही तर उपासमार होईल.- सुनील साळवी, ग्रामस्थ 

टॅग्स :DamधरणRaigadरायगड