शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर वनविभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:02 IST

वन विभागातर्फे जयेंद्र भगत यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : संरक्षित वन्य प्राणी असलेल्या भेकराचे मांस घरात ठेवल्याबद्दल अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष आणि वाडगावचे उपसरपंच जयेंद्र भगत यांच्यावर अलिबाग पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी मुद्देमाल वन विभागाकडे देण्यात आलेला आहे. वन विभागातर्फे जयेंद्र भगत यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

वाडगाव येथील उपसरपंच जयेंद्र भगत यांनी फणसाड अभयारण्यात शिकार करून भेकर जातीच्या संरक्षित वन्य जीव प्राण्याचे मांस घरात ठेवले असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी प्रभारी पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी पथकासह भगत यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी फ्रिजमध्ये भेकराचे एक किलो मांस आढळले. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एन. मुसळे यांनी दोन पंचासमक्ष सर्व मुद्देमाल जप्त केला आणि पुढील कारवाईसाठी  वन विभाग वन परिक्षेत्र अधिकारी अलिबाग यांच्या ताब्यात दिला. जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, मुसळे, प्रदीप देशमुख, जितेंद्र चवरकर, गणेश पारधी, सागर गोळे यांनी ही कारवाई केली. 

भेकराची शिकार कोणी केली याचा तपास करणार

अलिबाग वनविभागाचे नरेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जयेंद्र भगत याना ताब्यात घेतले. भेकराची शिकार करताना कोण सोबत होते, हत्यार कोणते वापरले, मांस कोणा कोणाला दिले यांचा तपास सुरू आहे. त्यामुळे वन विभागाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असून पुढील तपास करण्यात येणार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Group Leader Booked for Possessing Deer Meat

Web Summary : Alibag police arrested Jayendra Bhagat, an Ajit Pawar group leader, for possessing protected deer meat. Forest department is investigating the hunting incident, including accomplices and weapons used. Bhagat is currently in custody.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारforest departmentवनविभाग