न्हावा शेवा बंदरातून १०.०८ कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेट कंटेनर पकडला : महसूल गुप्तचर संचालनालय मुंबई विभागीय युनिटची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 22:25 IST2024-06-14T22:25:45+5:302024-06-14T22:25:55+5:30
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या मालाचे दोन संशयित कंटेनर रोखले.

न्हावा शेवा बंदरातून १०.०८ कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेट कंटेनर पकडला : महसूल गुप्तचर संचालनालय मुंबई विभागीय युनिटची कारवाई
मधुकर ठाकूर
उरण : न्हावा शेवा बंदरातून १०.०८ कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा कंटेनर जप्त केला आहे महसूल गुप्तचर संचालनालय मुंबई विभागीय युनिटने ही कारवाई केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या मालाचे दोन संशयित कंटेनर रोखले.दोन्ही कंटेनरची तपासणी केल्यानंतर कथित चिनी कापडाचे विणलेले गालिच्यात जुन्या आणि वापरलेल्या गालीच्यांचे ३२५ रोल वाहून नेत असल्याचे खोटेच सांगितले.
यामुळे संशय अधिक बळावला.तपासणी केल्यावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांना कापडाच्या गुंडाळ्यामध्ये सिगारेटच्या एकूण ६७ लाख २० हजार विदेशी कोरियन बनावटीच्या सिगारेटच्या कांड्या लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आला. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुन्या आणि वापरलेल्या गालीचांसह सर्व मुद्देमाल तात्काळ जप्त करण्यात आला.चिनी धाग्याचे विणलेले गालिचे असल्याचे खोटे सांगत हा माल न्हावा शेवा बंदरात
चोरट्या मार्गाने आणण्यात आला होता.