शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

Chiplun Heavy Rain Flood : चिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:59 IST

प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

ठळक मुद्देप्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.  एनडीआरएफची 2 पथके,  आर्मीचे 1 पथक, नौदलाचे 2 पथके, हवाईदलाचे 02 पथके तसेच 15 स्वयंसेवी संस्थांमार्फत बोंटीद्वारे मदत कार्य सुरु आहे.   नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पंरतु पाणी ओसरले तरी धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे पुन्हा चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सखल भागात व पूर प्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुढील काही दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित निवारा स्थळांमध्ये स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. चिपळूण तालुक्यातील आत्तापर्यंत सुमारे 1200 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्याठिकाणी भोजन, पाणी व निवासाची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहेत. वैद्यकीय पथक त्याठिकाणी तैनात करण्यात आले आहे.  

चिपळूण तालुक्यात नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्राची नावे पुढीलप्रमाणे आहेत.जिल्हा परिषद शाळा पाग मुलांची, पाग, ता.चिपळूणजिल्हा परिषद शाळा पाग क्र.05, पाग ता.चिपळूणरिगल कॉलेज कोंड्ये, कोंड्ये ता. चिपळूणमाटे सभागृह कापसाळ ता. चिपळूणपाटीदार भवन कापसाळ ता.चिपळूणडीबीजे कॉलेज चिपळूण

पाण्याचे स्त्रोत दुषित झाल्यामुळे विहीरींचे पाणी उकळल्याशिवाय पिण्यासाठी वापरु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. प्रशासनाच्यावतीने पथक तयार करुन निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.  पिण्याच्या पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. संपर्क तुटलेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी वायूदल व नौदलाच्या सहायाने मदत कार्य करण्यात येत आहे. 

नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी -9422404242जयराज सूर्यवंशी तहसिलदार  चिपळूण- 9890062357तहसिल कार्यालय चिपळूण 02355-252044प्रांत कार्यालय चिपळूण-02355-252046    

टॅग्स :ChiplunचिपळुणkonkanकोकणRainपाऊसfloodपूर