Five youngsters cheating on the railway job | रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून पाच तरुणांची फसवणूक
रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून पाच तरुणांची फसवणूक

पेण : रेल्वे खात्यात नोकरी लावतो असू सांगून पाच जणांची १७ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी ंचार जणांवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एका महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी सूत्रधार असलेल्या महिला आरोपीला पेण पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता पाचदिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सूत्रधार दोघेही पती पत्नी असून अशा या बंटी व बबलीच्या फसवणुकीमुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तब्बल १७ लाख ४० हजारांचा चुना लावला आहे.
२५ आॅक्टोबर २०१८ ते १५ ते २०१९ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला असून यातील विशाल मढवी (२२, रा. तळोजा ता. पनवेल) यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांच्यासह इतर चार सहकाऱ्यांना रेल्वे खात्यात नोकरी लावतो असे सांगून आरोपी रोहिणी घरत, राजेश घरत (रा. चावडीनाका, पेण) यातील मुख्य आरोपी पती-पत्नी असून त्यांच्यासोबत विनोद पाटील (रा. पिंपळपाडा पो. कोप्रोली तालुका पेण) व अमर दलाल (पूर्ण पत्ता माहिती नाही) या चौघांनी संगनमत करून विशाल मढवी यांच्याकडून ४ लाख ५० हजार रुपये त्याचे सहकारी नितेश हुबंरे (रा. धावटे तालुका पेण) यांच्याकडून चार लाख रुपये, विनोद म्हात्रे (रा. मोठे भाल तालुका पेण) यांच्याकडून दोन लाख रुपये, अनिल म्हात्रे (रा. मोठे भाल तालुका पेण) यांच्याकडून एक लाख ९० हजार, प्रशांत पाटील (रा. पेण) यांच्याकडून पाच लाख असे एकूण १७ लाख ४० हजार रुपये रेल्वेत नोकरी लावण्यासाठी स्वीकारून त्यांना रेल्वेत नोकरी न लावता व त्यांचे पैसे
परत न करता फसवणूक केली आहे.
यातील आरोपी रोहिणी घरत हिने फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना आपण स्वत: रेल्वेत सीएसटी आॅफिसमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर असल्याची खोटी बतावणी केली. तसेच यातील आरोपी विनोद पाटील यांनी देखील रोहिणी घरत यांनी मला स्वत: सीएसटी आॅफिसमध्ये बोलावून माझी मेडिकल केल्याचे व माझी जॉईनिंग लेटर १ जूनला होणार असल्याचे खोटे सांगून फिर्यादी व त्यांच्या सहकाºयांचा विश्वास संपादन के ला. आरोपी राजेश घरत हा पेण एसटी डेपोत कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. असे दिलेल्या फिर्यादीत तक्रारदारांनी नमूद केले असल्याची माहिती पेण पोलिसांनी दिली.
या प्रकरणी संबंधित चार आरोपींविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. पी. पाटील या करीत आहेत. यातील गुन्ह्याशी संबंधित तीन आरोपींचा पेण पोलीस शोध घेत आहेत.


Web Title:  Five youngsters cheating on the railway job
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.