मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव

By निखिल म्हात्रे | Updated: February 28, 2025 16:05 IST2025-02-28T16:04:37+5:302025-02-28T16:05:17+5:30

बोट बाहेर काढण्यासाठी लागला सहा तासांचा काळ

fishing boat caught fire in the deep sea off Alibaug | मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव

मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव

अलिबाग - येथील खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या  बोटीला आग लागली. ९० टक्के बोट जळून खाक झाली असून या बोटमालकाचे १ कोटी ८० लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे बोटीत असलेल्या १८ खलाशांचा जीव वाचला आहे. बोट बाहेर काढण्यसाठी सहा तासांचा अधिक काळ लोटला होता. कोस्ट गार्डच्या मदतीने आग विझविण्यात आली.

शुक्रवारी पहाटे समुद्रातून मच्छीमारी करण्यासाठी एकवीरा माऊली हि बोट गेली होती, बोटीवरील खलाशी परतीचा प्रवास करीत होते. बोटीत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग ईतकी भयावह होती की बोट पूर्ण जळून खाक झाली. बोटीला आग लागली असल्याचे कळताच आग विझविण्याचा प्रयत्न बोटीतील खलाशांनी केला होता. मात्र त्यांचे प्रयत्न असफल ठरले. आगीचे लोंढे वाढताना दिसातच बोलतील खलाशांनी समुद्रात उड्या घेतल्या व होडीतून किनार्‍यावर आले.

कोस्ट गार्डच्या मदतीने आग विझविण्यात आली मात्र बोटीतील जाळी, मच्छिमारासाठी लागणारे अवजारे जळून खाक झाली. समुद्रातील बोट किनार्‍यावर आणण्यासाठी एक एक करीत सर्व मच्छीमार बोट बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करू लागले होते. बोटीतील यंत्र सामुग्री निकामी झाली आहे. साधारण सहा तासांच्या अथक परीश्रमानंतर बोट बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले.

पहाटेच्या सुमारास बोटीला आग लागल्याचे आम्हाला कळताच आम्ही दुसऱ्या बोटीने घटनास्थळी पोहोचलो. तो पर्यंत बोट पूर्ण जळून खाक झाली होती. बोटीचा पाया फक्त राहिला. या बोटीला खेचत जटेटीवर आणले. या दुर्घटनेमुळे आमचे १ कोटी ८० लाखाचे नुकसान झाले आहे. एकतर अगोदर आम्ही कर्ज बाजरी आहोत, त्यात पुन्हा आता आमच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
- राकेश गण, बोटीचे मालक.

पहाटे चारच्या सुमारास अचानक हा प्रसंग घडला आहे. त्यामधे आमच्या नाखवाची हानी झाली आहे. अनेकवेळा असे नुकसान होत असते, आमच्या मदतीला सरकार कधीच धाऊन येत नाही. आता तरी आमच्या या बांधवाला सरकारने आर्थिक मदतीचा हात पुढे करावा.
- भगवान नाखवा, मच्छीमार.
 

Web Title: fishing boat caught fire in the deep sea off Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.