अलिबागमध्ये ऑटो स्पेअर पार्ट दुकानाला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:39 IST2023-02-14T13:38:39+5:302023-02-14T13:39:02+5:30
अलिबाग शहरातील बायपास परिसरात असलेल्या एका ऑटो स्पेअर पार्ट दुकानाला आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे.

अलिबागमध्ये ऑटो स्पेअर पार्ट दुकानाला आग
अलिबाग :
अलिबाग शहरातील बायपास परिसरात असलेल्या एका ऑटो स्पेअर पार्ट दुकानाला आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली आहे. ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
VIDEO: अलिबागमध्ये ऑटो स्पेअर पार्ट दुकानाला आग pic.twitter.com/Ya5VEAgVsH
— Lokmat (@lokmat) February 14, 2023
दुकानात ऑईल असल्याने आगीचा भडका उठत असल्याने विझविण्यात अडचणी येत आहेत. मात्र अग्निशमन पथकाने तासाभराच्या प्रयत्नाने आग विझविण्यात यश मिळविले आहे. ही आग नक्की कशाने लागली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही आहे. मात्र दुकानदारांचे लाखोचे नुकसान झाल्याचे कळत आहे.