शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

दोन दिवसात पन्नार हजार चाकरमानी कोकणात

By निखिल म्हात्रे | Updated: September 18, 2023 16:15 IST

या वाहनांची नोंद पोलिसांच्या डायरीत केली जात आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - मुंबई - गोवा महामार्गावरून गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांना घेऊन निघालेल्या विविध प्रकारच्या वाहनांची अत्यंत वेगवान वर्दळ आहे. या वाहनांची नोंद पोलिसांच्या डायरीत केली जात आहे. एका तासाला सरासरी 350 वाहने मुंबई-गोवा महामार्गावरुन कोकणाकडे रवाना होत असल्याची माहिती अपर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

महामार्गावरुन गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्याकरिता खारपाडा येथे कोकणात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची नोंद रायगड पोलीसांच्या विशेष यंत्रणेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. या नोंदी नुसार मागील दोन दिवसात पन्नास हजार गाड्या महामार्गावरून धावल्या आहेत. रविवारी सकाळी सहा वाजल्या पासून या सरासरी वाहन संख्येमध्ये वाढ होत असून मोठ्या प्रमाणात वाहने कोकणात जात होत्या. जेवणाकरिता चाकरमानी महामार्गावर ठिकठिकाणी थांबल्यामुळे दुपारच्या वेळेत सरासरी वाहन प्रमाण काहीसे कमी होते. मात्र चार वाजल्या पासून या प्रमाणात वाढ झाली होती.

मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून माणगाव जवळ बायपासचे काम अपूर्ण असल्याने माणगाव बाजारपेठेत वाहतुकीचा ताण पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते, इंदापूर व माणगाव येथील बायपास मार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी ही नित्याचीच होणार आहे. यंदाचे वर्षी वाहतूक कोंडी होवू नये व गणेशभक्तांना आपल्या गणरायाच्या दर्शनाला वेळेत पोहोचता यावे, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने महत्वाची खबरदारी घेतली होती.गेल्या दोन दिवसांत 2100 खासगी बसेसमधून चाकरमानी कोकणात रवाना झाले. बसेस व्यतीरिक्त खासगी कार, टेम्पो आदि सुमारे १ लाख ५५ हजार वाहने कोकणात रवाना झाली आहेत. दरम्यान पोलादपूर खेड दरम्यानच्या कशेडी बोगद्यातून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आल्याने येथील वाहतूक सुरळीत आणि वेगाने सुरु असल्याची माहीती अपर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.गणेशोत्सवाकरिता मुंबई, ठाणे, पालघर या प्रमुख जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गणेशभक्त आपल्या कोकणातील गावी निघाले होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर आणि वाहतूक कोंडी विना व्हावा याकरिता महामार्गाच्या खारपाडा ते कशेडी या रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रायगड जिल्हा पोलीस दलातील ६० पोलीस अधिकारी आणि ३३५ पोलीस जवान २४ तास तैनात करण्यात आले आहेत. या बरोबरच पालीफाटा (खोपोली) ते वाकण या महामार्गावर देखील पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान शनिवार व रविवारी बंदी आदेश मोडणाऱ्या 365 अवजड वाहनांवर रायगड पोलीसांनी कारवाई करीत 2 लाख 43 हजार 650 रुपयांची दंड आकारला आहे. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक.

टॅग्स :ganpatiगणपतीalibaugअलिबाग