शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मानिवली पुलाअभावी शेतकरी त्रस्त, १९९६ मध्ये कोसळला पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:03 IST

मानिवली गावातील शेतकºयांची शेती पोसरी नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात आहेत.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील मानिवली गाव आणि कळंब-पाषाणे रस्ता जोडणारा पोेसरी नदीवरील पूल १९९६ मध्ये कोसळला आहे. पोसरी नदीवर असलेला लोखंडी प्लेटचा पूल वाहून गेला असून, या पुलाअभावी मानिवली गावातील शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. मानिवली गावातील शेतकऱ्यांची ८० टक्के शेती नदीच्या पलीकडे असल्याने आणि जाण्यासाठी पूल नसल्याने शेतक-यांना तब्बल ७ ते ८ किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे. मात्र, हा पूल पुन्हा उभा राहावा, म्हणून शासकीय यंत्रणेने अद्याप काहीही केले नाही.मानिवली गावातील शेतकºयांची शेती पोसरी नदीच्या पलीकडे म्हणजे पाषाणे, आर्डे आणि खाड्याचा पाडा भागात आहेत. मानिवली गावाच्या आजूबाजूला जेमतेम २५ टक्के जमीन मानिवली ग्रामस्थांची असून, पावसाळ्यात त्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थ हे होडीच्या साहाय्याने शेतकºयांना पलीकडे शेतीच्या कामासाठी सोडण्याचे काम करायचे आणि संध्याकाळी पुन्हा घरी आणायचे, परंतु १९७२ साली शेतीच्या कामासाठी पावसाळ्यात जात असताना, मानिवली येथे होडी परत येत असताना अपघात झाला होता. त्यात तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला होता, तर पुरुष हे नदी पोहून बाहेर आले होते. त्यानंतर, पोसरी नदी पार करण्यासाठी वापरात असलेली होडी कायमची बंद झाली. यानंतर, १९९०ला तेथे पूल बांधण्यासाठी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांनी पाठपुरावा केल्यानंतर, मानिवली गावाच्या ग्रामस्थांना नदी पार करण्यासाठी पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.मात्र, पाच वर्षांत पुलासाठी केवळ खांब उभे राहिले. शेवटी १९९६ मध्ये लोखंडी प्लेट टाकून पुलावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, दीड वर्षांत त्या लोखंडी प्लेट कोसळल्या. दोन वर्षे पुलाची दुरुस्ती वेळेवर झाली नसल्याने अवघ्या दोन वर्षांत लोखंडी प्लेटचा पूल कोसळला आणि पोसरी नदी पार करण्याचा पर्याय निघून गेला आहे. आता केवळ मानिवली येथे नदीवर पुलाच्या पाच खांबांपैकी दोनच खांब आपले अस्तित्व सांगत आहेत. पूल कोसळल्याने आणि पुन्हा उभा होण्याची स्थिती दिसत नसल्याने नदीच्या पलीकडे शेती असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.आमच्या गावातील शेतकºयांनी शेती करायचीच नाही काय? आणि शेती न करता कसे जगायचे? - गणेश डायरे, शेतकरीअनेक शेतकºयांनी केली शेती बंदमानिवली गावातील ८० टक्के शेती पोसरी नदीच्या पलीकडे आहेत. त्या पेसरी नदीवर पूल नसल्याने मानिवली गावातील शेतकºयांना पावसाळ्यात शेतीची कामे करण्यासाठी मानिवली गावातून वरई आणि पुढे चिकनपाडा गावातून माले होऊन पाषाणे येथे पोहोचावे लागते.हा सर्व फेरा एका वेळी किमान ७ ते ८ किलोमीटरचा असून, शेतीची कामे करण्यासाठी आवश्यक अवजारे घेऊन पायी एवढे अंतर पार करणे कठीण असल्याने, मानिवली गावातील काही शेतकºयांनी आर्थिक कुवत नसल्याने शेतीची कामे करणे थांबविले आहे.त्यामुळे हा पूल होण्यासाठी सर्वांसाठी फायद्याचे असून, मानिवली येथील पुलाच्या निर्मितीसाठी शासकीय पातळीवर कोणीही आवाज उठवताना दिसत नाही. त्याचा परिणाम मानिवली येथे पोसरी नदीवर पूल होणार की नाही? याबाबत शंका येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड