शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या मुंबईच्या सर्व्हेसाठी आखलेले पट्टे शेतकऱ्यांनी पेटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:23 IST

सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. 

उरण :उरण तालुक्यात तिसऱ्या मुंबईच्या ड्रोन सर्व्हेसाठी येणाऱ्या कामगारांना शेतकरी हुसकावून लावत आहेत. सारडे, चिरनेरपाठोपाठ खोपटे येथील सर्वेक्षणासाठी आलेल्या कामगारांना  शेतकऱ्यांनी शुक्रवारी हुसकावून लावतानाच रंगाने आखलेल्या पट्टे पेटवून दिले. यावेळी सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. 

सरकारने केएससी नवनगरच्या (कर्नाळा-साई-चिरनेर) या तिसऱ्या मुंबईची घोषणा करून उरण, पनवेल, पेण तालुक्यांतील १२४ महसूल गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्याची तयारी सुरू केली. यासाठी सरकारने गावोगावी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. मात्र, एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित तिसऱ्या मुंबईसाठी साडेबावीस टक्के योजनेंतर्गत भूसंपादनास शेतकऱ्यांनी याआधीच विरोध दर्शविला आहे. २५ हजार शेतकऱ्यांनी हरकतीही नोंदविल्या आहेत. शासनाविरोधात संघर्षही सुरू केला आहे. 

खोपटे विभागात सर्वेक्षणासाठी आलेल्या कामगारांनाही माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे,  प्रशांत ठाकूर, महेंद्र पाटील आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः हुसकावून लावण्यात आले. रंगाने आखलेल्या पट्ट्यांना संतप्त शेतकऱ्यांनी पेटवून देत शेतकरी विरोधी सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला.

प्रकल्प लादू देणार नाही

शेतकऱ्यांनी २०१३च्या नवीन भूसंपादन कायद्यांतर्गत जमीन संपादित करावी. घरे प्रथम नियमित करावीत, अशी मागणी शासनाकडे केली आहे. शासन मात्र बड्या भांडवलदारांचे तारणहार म्हणून काम करीत आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प या ठिकाणी लादू देणार नसल्याचा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यासाठी एमएमआरडीए विरोधी केएससी नवनगर संघर्ष समितीच्या माध्यमातून संघर्ष सुरू  आहे.

 भूसंपादनाला विरोधात करण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून  जनजागृती करण्यात येत आहे. सभा, बैठका, पत्रके काढून त्याचे  वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Burn Survey Lines, Protest Third Mumbai Land Acquisition

Web Summary : Farmers in Uran are protesting the third Mumbai project by burning survey markings and preventing workers from conducting drone surveys. They oppose land acquisition under the 22.5% scheme and demand adherence to the 2013 Land Acquisition Act, vowing to resist the project.
टॅग्स :uran-acउरणRaigadरायगड