शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

बंधा-याच्या दुरु स्तीसाठी शेतक-यांचे प्रयत्न सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 6:58 AM

होळीच्या सागरी उधाणात पेण तालुक्यातील ढोंबी व माचेला गावांमधील २३०० एकर भातशेती जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरून हाहाकार उडाल्याने खाडी किनारच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना पडलेल्या भगदाडांची (खांडीची) दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे झाले आहे.

- जयंत धुळपअलिबाग : होळीच्या सागरी उधाणात पेण तालुक्यातील ढोंबी व माचेला गावांमधील २३०० एकर भातशेती जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरून हाहाकार उडाल्याने खाडी किनारच्या समुद्र संरक्षक बंधाºयांना पडलेल्या भगदाडांची (खांडीची) दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे झाले आहे. पेण तालुक्यातील माचेला गावच्या काही शेतकºयांनी जेएसडब्लू कंपनीच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाखल केलेल्या दाव्यामुळे माचेला गावाच्या गट नं. ९४ मधील न्यायालयीन बाब टाळून काम करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे. खार देवळी उघाडीच्या नाल्यात पाइप टाकून तात्पुरता पूल तयार करून बांधबंदिस्ती मार्गे भराव करीत ढोंबी व माचेला नजीक संरक्षक बंधाºयाला (बाहेरकाठ्याला) पडलेली भगदाडे (खांडी) जेएसडब्लू कंपनीच्या वतीने बांधण्यासाठी शेतकºयांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अरु ण शिवकर यांनी दिली आहे.फुटलेल्या या समुद्र संरक्षक बंधाºयांच्या अनुषंगाने पेण उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालयात शेतकºयांच्या समवेत झालेल्या सभेमध्ये, न्यायालयीन बाब टाळून नवीन मार्ग शोधून संरक्षक बंधारे दुरुस्तीकरिता प्रयत्न करावा,असे पेण उप विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले होते. त्यानुसार शेतकरी प्रतिनिधी व खारभूमी खात्याचे अधिकारी सुभाष निंबाळकर यांनी फेर सर्व्हे करून एच.आर.जॉन्सन कंपनीच्या बाजूने काराव गट क्र . २९,२०,२१,२२ व खार देवळी गट क्र . ३,४,५ येथून मार्ग शोधला आहे.५ मार्च रोजी सामाजिक कार्यकर्ते अरु ण शिवकर यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात काराव ग्रामपंचायतीमध्ये तातडीची बैठक घेतली. या बैठकीला काराव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन पाटील, खार डोंगर मेहनत आघाडीचे अध्यक्ष पांडुरंग तुरे, काराव ग्रा.पं.च्या सदस्य व जुईअब्बास, खारपाले, ढोंबी व गडब भागातील शेतकरी हजर होते. संरक्षक बंधारे (खांडी) बांधण्यासाठी सुचविलेल्या मार्गात किरण मढवी, यशवंत पाटील, दत्ताराम म्हात्रे, किसान म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, दामोदर पाटील, काशिनाथ जांभूळकर हे शेतकरी येत असून त्यांच्या घरी जाऊन समितीने भेट घेतली व त्यांच्या शेतातून मार्गासाठी संमती मिळवली. या सर्व शेतक ºयांनी हजारो शेतकºयांची उपासमार लक्षात घेऊन सामाजिक भावनेने ही संमती दिली.न्यायप्रविष्ट बाब टाळून मार्ग निश्चित१होळीच्या समुद्र उधाणात नेहमीपेक्षा जास्त २३०० एकरांत खारे पाणी शिरून नुकसान झाले आहे. शासनाची व जेएसडब्लू कंपनीची हे संरक्षक बंधारे (खांडी) बांधून देण्याची तयारी असली तरी माचेला गावाच्या काही शेतकºयांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात दावा दाखल केला आहे.२यामध्ये रायगड जिल्हाधिकाºयांना प्रतिवादी करण्यात आले आहे, तर खार माचेला गट क्र . ९४ मधील कांदळवन तोडीबाबत जेएसडब्लू कंपनीवर दिवाणी न्यायालय दोषारोप निश्चितीवर प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे गट नं. ९४ मधील न्यायप्रविष्ट बाब टाळून वरील मार्ग निश्चित करण्यात आला असल्याचे शिवकर यांनी सांगितले.बांधबंदिस्तीमार्गे संरक्षक बंधारे बांधणारच्माचेला-चिर्बी ही खारभूमी योजना असून यामध्ये माचेला, चिर्बी, खारघाट, जांभेळा या गावाच्या भातशेती जमिनी अंतर्भूत आहेत.च्माचेला-चिर्बी संरक्षक बंधाºयाच्या (बाहेरकाठ्याच्या) बाजूला गट नं. ९४ हे दक्षिणेच्या बाजूने समांतर रेषेत लांबलचक पसरलेले आहे.च्या बांधावर खारभूमी विकास खात्याचा अधिकार आहे व आजच्या गंभीर परिस्थितीत शेतकºयांची उपजीविका त्यावर अवलंबून असल्याने शासनाने न्यायालयाचा अवमान न करता कोणत्याही शेतकºयांच्या शेतात भराव न टाकता फक्त बांधबंदिस्तीमार्गे या संरक्षक बंधारे (खांडी) बांधण्यासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी. वेळ पडल्यास कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहन काराव व खारपाले ग्रामपंचायत तसेच बाधित शेतकºयांनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड