शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:39 IST2018-10-28T23:38:42+5:302018-10-28T23:39:04+5:30
गॅस कंपनीविरोधात संताप; निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरूच
वडखळ : रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात तफावत केल्याप्रकरणी पेण प्रांत कार्यालयासमोर शेतकºयांनी सुरू केलेले साखळी उपोषण चौदाव्या दिवशीही सुरूच आहे. मंगळवारपासून विष्णू पाटील हे बेमुदत उपोषणास बसणार आहेत.
रिलायन्स कंपनीच्या नागोठणे ते गुजरातमधील दहेजपर्यंत इथेन गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील ५२९ शेतकरी लाभार्थी आहेत. सदर जमीन संपादित करताना काही शेतकºयांना ८० हजार तर काही शेतकºयांना २ लाख, तर काहींना ३ ते ७ लाखापर्यंत भाव देण्यात दिला असून कंपनीने मोबदल्यात तफावत केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत, याबाबतचे पुरावे शेतकºयांचे नेते विष्णू पाटील यांनी जिल्हाधिकाºयांसमोर सादर केले. मोबदला देण्यात तफावत का? असा सवाल उपस्थित करीत येत्या गुरुवारपर्यंत शेतकºयांच्या मोबदला वाटपाचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. परंतु तीन दिवस झाले तरी रिलायन्स कंपनीने याबाबतची माहिती अद्यापही दिलेली नाही.
जिल्हा प्रशासन व महसूल खात्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रांत कार्यालयासमोर शेतकºयांनी सुरू केलेले साखळी उपोषण चौदाव्या दिवशीही सुरूच आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश देऊनही रिलायन्स कंपनीची मुजोरी सुरूच आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असून ३0 आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे विष्णू पाटील यांनी सांगितले.