शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या कामाचा शेतकऱ्याला फटका

By admin | Updated: May 7, 2017 06:17 IST

महामार्गाच्या रुंदीकरणात नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीची खालील बाजूची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात

राजू भिसे/ लोकमत न्यूज नेटवर्कनागोठणे : महामार्गाच्या रुंदीकरणात नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीची खालील बाजूची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात साचणारे पाणी जायला जागाच राहिलेली नाही. उन्हाळ्यातही शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने भात, तसेच कडधान्याचे पीक घेता न आल्याने एका शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागले आहे. महामार्गाचे ठेकेदार मोरीची सुधारणा करण्याचे गेली ३ वर्षे फक्त आश्वासनच देत असून, तीन ते चार वर्षे शेती नापीकच राहिल्याची माहिती अयुब मुल्ला यांनी दिली.अयुब मुल्ला आणि त्यांच्या बंधूंची मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे-पेण फाट्यावर पूर्व बाजूला गट नं. १९३ मध्ये १-६५-३ हे. आर. अशी वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या ठिकाणी १० खंडी भात, तसेच १० पोती वाल आणि पावटा या कडधान्याची पिके दरवर्षी घेतली जायची. महामार्गाच्या रुंदीकरणात जुन्या रस्त्याला जोडून दुसरी मोरी बांधण्यात आलेल्या नवीन मोरीची खालील उंची २ फुटांनी वाढविण्यात आल्याने शेतातच अडून राहते, असे अयुब मुल्ला यांनी सांगितले. केवळ आश्वासने महामार्गाचे ठेकेदार असलेल्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत तीन ते चार वेळा ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, आश्वासनांव्यतिरिक्त प्रत्यक्षात काहीही होत नाही. याबाबत दोन वर्षांपूर्वी रोहे तहसीलदारांचेसुद्धा निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.