शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

आश्रमशाळांच्या निकालात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 1:31 AM

सरासरी निकाल ५४.४१ टक्के : पेण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत १३ प्रशाला

पेण : दहावी शालान्त परीक्षेच्या निकालात पेण येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांच्या निकालात मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. प्रकल्पाच्या अखत्यारीतील एकूण १३ प्रशाला आहेत. या शाळांमधून ५५५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी टक्केवारी ५४.४१ इतकी आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या निकालात २७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. प्रशालेमधील पनवेल- साई आश्रमशाळेचा निकाल सर्वात जास्त ९४.७३ टक्के इतका लागला आहे, तर सर्वात कमी निकाल पेणमधील वरसई आश्रमशाळेचा १६.२० टक्के इतका लागला आहे.

आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत शैक्षणिक सोयी सुविधांवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, शाळांचे व्यवस्थापन व शैक्षणिक गुणवत्तेत प्रगती दिसत नाही. पेणमध्ये प्रकल्प कार्यालय असतानाही शालान्त परीक्षेच्या निकालात आश्रमशाळांची शैक्षणिक प्रगती हवी तशी दिसत नाही. येथील वरसई शाळेचा निकाल १६.२० टक्के, सावरसई ३१.१४ टक्के तर वरवणे शाळेचा निकाल ३५.५५ टक्के असा निकाल घसरला आहे. या तीन शासकीय आश्रमशाळांचे मिळून एकूण १४३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पेणमधील या तीन आश्रमशाळांचा सरासरी निकाल २६.४३ टक्के इतका लागला आहे. प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पायरण येथील आश्रमशाळेचा निकाल ७६.४७ टक्के , सानेगाव ७४.४८ टक्के, वेरळ ६८.७५ टक्के, कादवण ६५ .२१ टक्के, भालिवाडी ६५.०० टक्के व पिंगळे शाळेचा निकाल ५६.६६ टक्के लागला आहे. याबाबत विचारणा केली असता, ज्या आश्रमशाळांचे निकाल कमी लागलेत त्या आश्रमशाळेतील शिक्षकांना आगामी वर्षातील निकालात प्रगती केली नाही तर उचलबांगडी करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आश्रमशाळांची शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढीसाठी आता प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांना शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा लागणार आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जि. रायगडइयत्ता दहावी निकाल (शासकीय आश्रमशाळा)आश्रमशाळा परीक्षार्थी उत्तीर्ण विद्यार्थी निकालपायरज ६८ ५२ ७६.४७भालीवडी ४० २६ ६५वरसई ३७ ६ १६.२०सानेगाव ३५ २६ ७४.२८चाफेवाडी ६३ २६ ४१.२६पिगळस ६० ३४ ५६.६६डोलवली २४ ११ ४५.८३साई ३८ ३६ ९४.७३सावरसई ६१ १९ ३१.१४वरवणे ४५ १६ ३५.५५कोळघर २२ ९ ४०.९०सादवण ४६ ३० ६५.२१वेरळ १६ ११ ६८.७५एकूण ५५५ ३०२ ५४.४२

टॅग्स :Raigadरायगड