सेंटमेरी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन: चार दिवसीय प्रदर्शनासाठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 17:51 IST2023-12-05T17:48:53+5:302023-12-05T17:51:23+5:30
उरणच्या सेंटमेरी हायस्कूलच्या आवारात आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय प्रदर्शन कला समावेश शिक्षक संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आले होते.

सेंटमेरी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन: चार दिवसीय प्रदर्शनासाठी गर्दी
मधुकर ठाकूर
उरण येथील सेंट मेरीज हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन शुक्रवार ते सोमवार असे चार दिवसांचे विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकर्षक ,सुंदर निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.या प्रदर्शनात पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची विविध प्रकारची सुमारे १२५ चित्रं पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती.
उरणच्या सेंटमेरी हायस्कूलच्या आवारात आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय प्रदर्शन कला समावेश शिक्षक संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आले होते.यामध्ये याच शाळेतील पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची विविध प्रकारची सुमारे १२५ चित्रं प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांची आकर्षक ,सुंदर निवडक पोर्टेट, पेन्सिल स्केच, ऍबस्ट्रॅक्ट, म्युरल , लँडस्केप आदी सुमारे १२५ चित्रांचे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव वाव मिळावा यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले होते अशी माहिती कला शिक्षक संतोष पाटील यांनी दिली.
सेंटमेरी हायस्कूलमध्ये सलग चार दिवस भरविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक, नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.