जिल्ह्यातील २१ केंद्रांवर परीक्षा
By Admin | Updated: May 11, 2017 02:05 IST2017-05-11T02:05:22+5:302017-05-11T02:05:22+5:30
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सामाईक पात्रता एमएचटी-सीईटी परीक्षा गुरु वार, ११ मे रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ८ हजार ५२० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

जिल्ह्यातील २१ केंद्रांवर परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सामाईक पात्रता एमएचटी-सीईटी परीक्षा गुरु वार, ११ मे रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २१ केंद्रांवर ८ हजार ५२० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
सकाळी १० ते १०.३०, दुपारी १२.३० ते २ आणि दुपारी ३ ते ४.३० या वेळेत तीन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी दंड प्रक्रि या संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्यामुळे परीक्षा केंद्रांवर एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करता येणार नाही.
रायगड जिल्ह्यातील २१ केंद्रांमध्ये जा.र.हा. कन्याशाळा कनिष्ठ महाविद्यालय अलिबाग - ४३२ विद्यार्थी, जनरल अरु णकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज अलिबाग- ६७२ विद्यार्थी, जे.एस.एम. कॉलेज अलिबाग - ७६८, अॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग - ५०४, सी.एच. केळुसकर होमिओपॅथिक कॉलेज अलिबाग- १२०, चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग - १२०, सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबाग- २४०, आर. सी. एफ. सेकंडरी विद्यालय कुरु ळ - ४८०, को.ए.सो. रामभाऊ पाटील बामणगाव - १९२, लिटिल एंजल स्कूल पेण - ३८४, पी.एन.पी. हायस्कूल वेश्वी - ६४८, स.म. वडके विद्यालय चोंढी ( किहीम) - ६००, ना.ना. पाटील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पोयनाड - ५५२, पेण एज्युकेशन सोसायटीचे प्रायव्हेट हायस्कूल पेण - ९१२, एम. एन. नेने कन्या विद्यालय पेण - ६२४, सार्वजनिक विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज, पेण - ५२८, पी. एस. एम. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, पेण - २८८, डॉ. पतंगराव कदम कॉलेज आॅफ आर्ट्स अँड कॉमर्स, पेण - १६८ आणि कारमेल स्कूल देवनागरी सोसायटी, पेण- २८८ विद्यार्थी या केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात २१ केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश पात्रता एमएचटी-सीईटी परीक्षेकरिता ७१२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. ही परीक्षा निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्व केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.