शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

कर्जतमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:53 IST

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये व्होट व्हेरिफाइड पेपर एडिटर ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे या बाबतच्या जनजागृतीसाठी कर्जत प्रांत कार्यालयाच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये व्होट व्हेरिफाइड पेपर एडिटर ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे या बाबतच्या जनजागृतीसाठी कर्जत प्रांत कार्यालयाच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात, निवासी नायब तहसीलदार संजय भालेराव, लिपिक अविनाश गुर्लेसह भाजपाचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, राजाभाऊ कोठारी, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष इरफान अत्तार, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, दिनेश रावळ, कृष्णा जाधव, जया म्हसे आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी परदेशी यांनी ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट म्हणजे विश्वासाबरोबर खात्री. व्हीव्हीपॅटमध्ये प्रिंटर प्रमाणे जोडलेले आहे. मतदाराने ईव्हीएमवर बटण दाबल्यानंतर एक चिठ्ठी बाहेर पडते, त्यावर मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, क्र म आणि निवडणूक चिन्ह दिसते. या पद्धतीने अवलंब आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये प्रथमच केला जाणार आहे. निवडणुकीत पारदर्शकता आणण्याकरिता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. व्हीव्हीपॅट मतदान प्रणालीमुळे कोणाला मतदान केले आहे हे मतदाराला समजू शकणार आहे. मतदाराला त्याचे मत आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच पडले आहे याची खात्री करून घेता येणार आहे, असे सांगितले.कर्जत तालुक्यात २०६ मतदान केंद्र असून, पूर्ण मतदार संघात ३२६ मतदान केंद्र येत असून, या सर्व मतदान केंद्रात २८ डिसेंबरपासून ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत प्रात्यक्षिक दाखविण्याचा कार्यक्र म सुरू झाला आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.सर्वपक्षीय नेत्यांनी या वेळी ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे मतदान करून आपले मत योग्य ठिकाणी पडले की नाही, याची खात्री करून घेतली.व्हीव्हीपॅट मशिनची पनवेल तालुक्यात प्रात्यक्षिकेपनवेल : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका व्हीव्हीपॅट मशिनद्वारे घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे व्हीव्हीपॅट मशिनबाबत मतदार राजाच्या माहितीसाठी व जनजागृतीसाठी विहिघर, बोनशेत, भोकर पाडा, कोप्रोली, चिपळे या गावांमध्ये व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली, या वेळी हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.व्हीव्हीपॅट मशिनची उपयुक्तता व योग्यता नागरिकांना सांगण्यात आली. या वेळी पथक प्रमुख म्हणून पनवेल मंडळ अधिकारी संदीप रोडे, तलाठी अमोल घरत, कविता माने, अंकिता जोंधळे व सुनील पाटील उपस्थित होते. अशीच प्रात्यक्षिके इतर गावांमध्ये देखील दाखविली जाणार आहेत.

टॅग्स :Karjatकर्जत