माध्यमिक शिक्षक मतदार यादीमध्ये नावनोंदणी सुरू
By Admin | Updated: October 21, 2016 04:26 IST2016-10-21T04:26:42+5:302016-10-21T04:26:42+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कोकण शिक्षक मतदार संघाचा कार्यक्रम जाहीर झाला असून, महाडमध्ये माध्यमिक शाळांतील तीन वर्षे शिक्षण खात्यात काम

माध्यमिक शिक्षक मतदार यादीमध्ये नावनोंदणी सुरू
दासगाव/महाड : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कोकण शिक्षक मतदार संघाचा कार्यक्रम जाहीर झाला असून, महाडमध्ये माध्यमिक शाळांतील तीन वर्षे शिक्षण खात्यात काम केलेल्या शिक्षकांची शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. या नोंदणीचा अंतिम दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ आहे. ज्या शिक्षकांनी अद्याप या यादीमध्ये नाव नोंदवण्याचा अर्ज भरला नसेल अशा शिक्षकांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज भरण्याचे आवाहन महाड तहसीलदार यांनी केला आहे.
शासनाच्या धोरणानुसार ज्या माध्यमिक शिक्षकांना शासकीय शिक्षण खात्यामध्ये १ नोव्हेंबर २०१६ पर्यंत कमाल तीन वर्षे पूर्ण होत असतील अशा शिक्षकांनी धोरणानुसार कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी शिक्षक मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठी आपले अर्ज भरावे.