बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

By Admin | Updated: March 30, 2017 04:13 IST2017-03-30T04:13:36+5:302017-03-30T04:13:36+5:30

रोहा तालुक्यातील एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीच्या गरिबी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, तिला पैशांचे आमिष

Empowering the four rapists | बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

अलिबाग : रोहा तालुक्यातील एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीच्या गरिबी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, तिला पैशांचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या उम्या उर्फ उमेश जामकर, रूपेश फुलारे, निखिल ठाकूर आणि मया उर्फ महेंद्र कांबळे या चौघांना न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा बुधवारी सुनावली आहे.उम्या उर्फ उमेश जामकर, रूपेश फुलारे, निखिल ठाकूर या तिघा आरोपींनी वेळोवेळी गावच्या परिसरात पीडित मुलीशी पैशांच्या जोरावर शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला, तर चौथा आरोपी मयाने मुलीच्या घरात घुसून अत्याचार केला. तिने मुलाला जन्म दिल्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत उम्या हा मुलाचा पिता असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाने आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी  सहा हजार रुपये दंड सुनावला. यातील २० हजार रुपये पीडित  मुलगी व तिच्या मुलास नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Empowering the four rapists