शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगडमधील आठ तरुणांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:57 AM

आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषद इंटरनॅशनल एरॉटॉनिक काँग्रेस जिच्याशी नासा, जपान, रशिया, इस्रो, चायना, युरोपियन देशाच्या अवकाश संस्था संलग्न आहेत.

वडखळ : आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषद इंटरनॅशनल एरॉटॉनिक काँग्रेस जिच्याशी नासा, जपान, रशिया, इस्रो, चायना, युरोपियन देशाच्या अवकाश संस्था संलग्न आहेत. अशा शिखर संस्थेला जगातल्या ८६ देशांतून आलेल्या ४३२० शोध निबंधातून इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशन संस्थेमधील आठ संशोधकांनी सादर केलेल्या दोन संशोधनास मान्यता मिळून त्यांचे सादरीकरण करण्यास आॅक्टोबर २०१९ मध्ये एसीने आमंत्रण दिले आहे. या आठ तरुणांपैकी सात हे रायगड जिल्ह्यातील असून एक कल्याणमधील आहे.जगभरातील विविध संशोधक, अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे एसी समोर त्यांचे शोधनिबंध सादर करतील, त्यात आपल्या ग्रामीण भागातील हे तरुण संशोधक प्रथमच एकमेव भारतीय प्रतिनिधी म्हणून, आपले संशोधन जगातल्या सर्वोच्च अवकाशीय शिखर परिषद समोर आपले म्हणणे मांडतील. यामध्ये रिंकेश कुरकुरे, प्रज्ञेश म्हात्रे, विराज ठाकूर, हर्षवर्धन देशपांडे, भक्ती मिठागरे, वृषाली पालांडे, नमस्वी पाटील व कृपाल दाभाडे या आठ जणांचा सामावेश आहे. या आठ तरुणांपैकी सात हे रायगड जिल्ह्यातील असून रिंकेश कुरकुरे हा कल्याणमधील आहे. यात पहिला शोधनिबंध आहे टायटन या शनीच्या चंद्रासारख्या उपग्रहावरील लहरी हवामानाचा अभ्यास. कसिनी या उपग्रहाने पाठवलेल्या फोटोवरून टायटन हा पृथ्वीशी साम्य असलेला; पण मिथेन व इथेनने भरलेल्या नद्या, समुद्र डोंगर असलेला उणे १८० तापमानाचा उपग्रह ज्यावर पोहोचायला कसिनी अवकाशयानाला सात वर्षे लागली. पृथ्वी बाहेर मानवी वसाहत राहू शकेल, अशा ग्रहांच्या शोधमोहिमेतील टायटन या शनीच्या ५२ व्या चंद्राच्या पृष्ठभागावरील बदलाचा अभ्यास करून पुढची मोहीम आखण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय संस्था प्रयत्नशील आहे.दुसरा शोधनिबंध पृथ्वी व मंगळासहित इतर ग्रह यांच्या प्रदूषित वातावरणाचे पृथक्करण करून त्यात मानवी शरीर कसे टिकावावे, याचा आहे. हे दोन्ही शोधनिबंध इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशनतर्फे सादर करण्यात आले. आपल्या ग्रामीण भागातील मुलांना जागतिक व्यासपीठ मिळावे व अवकाश तंत्रज्ञानाचा प्रसार भारतामध्ये जास्तीत जास्त व्हावा, या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘इसा’ या नोंदणीकृत संस्थेच्या दुसऱ्याच वर्षाला मिळालेले यश निश्चितच अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंधाची दखल घेणे म्हणजे इंजिनीयरिंग मेडिकल क्षेत्रातील डिग्रीपेक्षाही फार मोठा बहुमान असतो, ज्यावर त्या व्यक्ती अथवा संस्थेची गुणवत्ता ठरते. यात आपण कमी पडतो म्हणून आय.आय.टी. ही भारतातील सर्वोत्तम संस्था जगात पहिल्या १०० नंबरमध्ये पण नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते, असे इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशनचे सचिव सुगम ठाकूर यांनी सांगितले, म्हणूनच हे यश सुखावह व खूप मोलाचे आहे. यासाठी सायस्टिंस्ट अस्ट्रॉनॉट कँडिडेट नासा प्रणित पाटील यांचे सहकार्य खूप मोलाचे आहे.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ‘इसा’ ही संस्था पेण जिल्हा रायगड येथून आपले नेटवर्क चालवून रॉकेट तंत्रज्ञान, अवकाश दर्शन, स्पेस कॅम्प, असे उपक्रम व शाळा, कॉलेजमध्ये अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित विविध सेमिनारचे आयोजन करून कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय स्वखर्चाने आपला सामाजिक वाटा उचलत असते. म्हणूनच तुटपुंजा शिदोरीवर मुलांनी मारलेली ही उंत्तुग भरारी नक्कीच कौतुकास्पद असल्याचे इम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशनचे सचिव सुगम ठाकूर यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडStudentविद्यार्थी