मृगगडाच्या संवर्धनासाठी दुर्गवीरांचे श्रमदान, जपला जातोय ऐतिहासिक वारसा  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 02:26 AM2020-01-21T02:26:16+5:302020-01-21T02:27:39+5:30

१,७५० फूट उंची असणाऱ्या किल्याचे ऐतिहासीक वैभव जतन करून ठेवण्यासाठी दुर्गवीरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

Durgavir's work for Enhancement of Mrugagad | मृगगडाच्या संवर्धनासाठी दुर्गवीरांचे श्रमदान, जपला जातोय ऐतिहासिक वारसा  

मृगगडाच्या संवर्धनासाठी दुर्गवीरांचे श्रमदान, जपला जातोय ऐतिहासिक वारसा  

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : गड, किल्ल्यांचा ऐतिहासीक वारसा जपण्यासाठी पूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता दुर्गप्रेमींनी राज्यभर श्रमदानातून गड संवर्धनाचे काम सुरू केले आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुधागडजवळील मृगगडावरही नियमीत श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात आहे. पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढला जात आहे. सदरेवरील गवत काढून गडाची साफसफाईही केली जात आहे.

रायगड जिल्ह्याला विपुल प्रमाणात दुर्गसंपत्ती लाभली असून मृगगडही त्याचाच एक भाग आहे. सुधागड तालुक्यामध्ये खोपोली ते पालीकडे जाणाºया रोडपासून डावीगडे वगळले की भेलीव गावाला लागून काथळामध्ये हा छोटासा किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली हा किल्ला असल्यामुळे घाटावरून कोकणात उरण्याच्या मार्गावर टेहळणीसाठी त्याचा उपयोग होत असावा असा अंदाज आहे. फक्त १७५० फूट उंची असणाºया किल्याचे ऐतिहासीक वैभव जतन करून ठेवण्यासाठी दुर्गवीरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

स्थानिकांच्या व दुर्गप्रेमींच्या मदतीने प्रत्येक महिन्याला श्रमदान मोहीम राबविली जात आहे. गडावर जाण्यासाठीच्या मार्गावर जंगल असून पर्यटक रस्ता चुकण्याची शक्यता आहे. यामुळे रोडवर प्रत्येक ठिकाणी गडावर जाण्याच्या मार्गाविषयी माहिती देण्यात आली आहे. गडाची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहे. गडावर असलेल्या पादूका, गुहा, दगडी बांधकाम असलेले पाण्याचे टाके, वाड्याचे अवशेष, बालेकिल्याचा भाग, महिषासूरमर्दीनीचे छोटे मंदिर याची माहिती देणारा नकाशा लोखंडी फलकावर लावण्यात आला असून त्यामुळे सोबत मार्गदर्शक नसतानाही गड व्यवस्थीत पाहता येतो.

मृगगडाविषयी माहिती पुढीलप्रमाणे
१सुधागड परिसरामध्ये भेलीव गावाजवळ मध्ययुगीन काळात किल्ल्याचे बांधकाम झाले
२घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्याच्या मार्गावर सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली हा किल्ला आहे
३उंबरखिंडीच्या ऐतिहासीक लढाईमध्येही टेहळणीसाठी गडाचा वापर झाला असावा असा अंदाज आहे
४गडावर एक नैसर्गीक
गुहा आहे
५गडाच्या शिखराकडे जाण्यासाठी खडक फोडून पायºया करण्यात आल्या आहेत
६गडावर दोन्ही बाजूला पाण्याची टाकी आहेत
७वाड्याचे व सदरेचे अवशेष पहावयास मिळतात

श्रमदान मोहिमेत सहभागी झालेले सदस्य : मुंबई, ठाणे,रायगड परिसरातील अनेक युवक, युवती श्रमदान माहिमेमध्ये सहभागी होत आहे. नुकत्याच झालेल्या संवर्धन मोहिमेमध्ये प्रशांत डिंगणकर, अल्पेश पाटील, जयवंत कोळी, आकाश ठाकूर, आदित्य दिक्षीत, शुभम पाटील, विशाल बामणे, सुरेश उंदरे, प्रतिक पाटेकर, विठ्ठल केंबळे, निहार घोंगे, उज्वला शिखरे, प्रियंका म्हात्रे, दिव्यता घाणेकर, प्रणिता उत्तेकर, कल्पना निवाते, संस्कृती हसुरकर, विनीता पनवेलकर, किरण पाटोळे, मंगल यादव, शीतल घुगारे, गार्गी डिंगणकर, शौर्य हासूरकर, गौरी थोरात यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Durgavir's work for Enhancement of Mrugagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड