शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

व्यंगमुक्तीमुळे १५९ जणांचे आयुष्य बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:47 IST

विद्रूपता आणणाऱ्या जखमा, हाता-पायांतील वाकडेपणा आदी शारीरिक समस्यांवर ‘प्लास्टिक सर्जरी’करून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलविता येऊ शकते;

- जयंत धुळपअलिबाग : दुभंगलेले ओठ आणि टाळू, भाजल्याने शरीराच्या दर्शनी भागांवर आणि विशेषत: चेहऱ्यांवर निर्माण झालेले व्रण आणि विद्रूपता आणणाऱ्या जखमा, हाता-पायांतील वाकडेपणा आदी शारीरिक समस्यांवर ‘प्लास्टिक सर्जरी’करून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलविता येऊ शकते; परंतु ही शस्त्रक्रिया मोठी खर्चिक आणि मुंबई-पुण्या सारख्या शहरातील रुग्णालयातच उपलब्ध असल्याने अल्प उत्पन्नगटातील गरीब माणूस या शस्त्रक्रिया करवून घेण्याचा विचारही करू शकत नाही.ग्रामीण भागातील लोकांमधील व्यंगांची समस्या, मूळ अलिबाग तालुक्यातील सारळ येथील रहिवासी आणि जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी जाणली आणि अलिबाग परिसरातच अशा व्यक्तींवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मोकल यांनी घेतला.डॉ. नितीन मोकल हे मुंबईतील नामांकित बॉम्बे, वाडिया, सुश्रुषा, जी.टी. रुग्णालयासह परदेशातील विविध रुग्णालयांत शस्त्रक्रिया करतात. अलिबागच्या ग्रामीण भागात या शस्त्रक्रिया कुठे कराव्या, हा प्रश्न असतानाच अलिबाग जवळच्या कार्लेखिंड येथील प्रयास रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी आपले आॅपरेशन थिएटर व संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांसह मोफत उपलब्ध करून देण्याचे सामाजिक उत्तरदायित्व निभावले. केवळ प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी येऊन शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते कारण या शस्त्रक्रिया करण्याकरिता अन्य शाखांचे डॉक्टर्स गरजेचे असतात, त्याकरिता अलिबागमधील ज्येष्ठ सर्जन डॉ. एस. एन. तिवारी, भूलतज्ज्ञ डॉ. संचिव शेटकार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, डॉ. रवींद्र म्हात्रे, भूलतज्ज्ञ डॉ. सुजाता मोकल, डॉ. शैलेश पालकर यांनी आपली वैद्यकीय साधनसामुग्री व औषधांसह या शस्त्रक्रिया शिबिरात विनामानधन सहभागी होण्याची तयारी दाखवली. त्यामुळे जवळपास १५९ जणांवर ही यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.पहिले संपूर्ण मोफत व्यंगमुक्ती शिबिर प्रयास रुग्णालयात २००९ मध्ये झाले आणि त्यात ग्रामीण भागातील २३ स्त्री-पुरुषांना व्यंगमुक्ती पूर्णत: मोफत प्राप्त होऊन त्यांचे आयुष्य खºया अर्थाने फुलले. त्यानंतर २०१३ मध्ये ३७, २०१६ मध्ये ५३ आणि गेल्या दोन दिवसात झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात ४0 ग्रामीण व्यंगग्रस्तांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यांच्या आयुष्यात आनंद फुलल्याची माहिती प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी दिली आहे.>जन्मत: व्यंगयुक्त अपत्ये जन्मास येऊ नये, याकरिता नवविवाहित दाम्पत्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहानंतर गर्भधारणा व अपत्यप्राप्ती या पूर्वीच्या काळात उभयतांंनी आरोग्य विषयक दक्षता सुयोग्य प्रकारे घेतली पाहिजे. आपल्या शरीरास गरजेच्या नसलेल्या गोष्टी आहार वा व्यसनांतून आपल्या शरीरात जाणार नाहीत याची दक्षता घेतल्यास नवजात अपत्यांतील व्यंग टाळता येऊ शकते.- डॉ. नितीन मोकल, प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ