शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नवी मुंबई मेट्रोच्या कामाला ठेकेदार नसल्याने ५ स्थानकांचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:33 IST

प्रकल्पाची रखडपट्टी : निविदा काढण्यात सिडकोकडून दिरंगाई

कमलाकर कांबळेनवी मुंबई : सिडकोचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प ठेकेदाराच्या नियुक्तीअभावी रखडला आहे. या मार्गावरील ११पैकी पाच स्थानकांचे काम मागील दोन अडीच वर्षांपासून ठप्प आहे, तर उर्वरित सहा स्थानकांचे काम कुर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे मेट्रोची डेडलाइनसुद्धा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिडकोने २0११मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कामाची गती मंदावली आहे. दरम्यानच्या काळात आर्थिक दिवाळखोरीमुळे मेट्रोच्या एका कंत्राटदाराने या प्रकल्पातून अंग काढून घेतले. तेव्हापासून या प्रकल्पाची रखडपट्टी सुरू आहे.सध्या ११पैकी सहा स्थानकांचे काम संथगतीने सुरू आहे, तर उर्वरित पाच स्थानकांचे काम ठेकेदाराअभावी ठप्प पडले आहे. त्याचा फटका सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर या कामांना बसला आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी डिसेंबर २0१८ चा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, कामच ठप्प पडल्याने आता मे २0१९ ची डेडलाइन जाहीर करण्यात आली आहे; परंतु रखडलेल्या कामासाठी ठेकेदार निवडीची प्रक्रिया अद्याप सुरूच झाली नसल्याने ही डेडलाइन सुद्धा हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पहिल्या टप्प्यातील ११ कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला होता. दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा केवळ २ कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे; परंतु पहिलाच टप्पा पाच वर्षे रखडल्याने उर्वरित तीन टप्प्यांचे कामही लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात दुपटीने वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मेट्रोच्या कामासाठी नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत मे २0१९ पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.- दीपक हरताळकर,अधीक्षक अभियंता (मेट्रो),सिडकोमेट्रो कोच धूळखात पडूनबेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्यातील ११ किमी लांबीच्या मार्गावर चिनी बनावटीच्या मेट्रो धावणार आहे. यासंदर्भात चिनी कंपनीबरोबर सिडकोने करार केला असून ३२0 कोटी रुपये किमतीच्या आठ मेट्रोची आयात केली जाणार आहे. त्यापैकी दोन मेट्रो कोच सिडकोच्या ताफ्यात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. सुमारे ८0 कोटी रुपये किमतीच्या या मेट्रो कोच मागील वर्षभरापासून धूळखात पडून आहेत.

टॅग्स :Raigadरायगडrailwayरेल्वेMetroमेट्रो