...अन् शोकाकुल वातावरणात पार पाडला बैलाचा दशक्रिया विधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 07:07 IST2019-03-10T23:09:52+5:302019-03-11T07:07:21+5:30
बैलगाडी स्पर्धेत रायगडची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौक तुपगाव येथील योगेश गुरव यांच्या शंकर नावाच्या बैलाचे नुकतेच निधन झाले.

...अन् शोकाकुल वातावरणात पार पाडला बैलाचा दशक्रिया विधी
मोहोपाडा : बैलगाडी स्पर्धेत रायगडची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौक तुपगाव येथील योगेश गुरव यांच्या शंकर नावाच्या बैलाचे नुकतेच निधन झाले. या बैलावर ग्रामस्थांनी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार केले. इतकेच नव्हे तर बैलावरील प्रेमापोटी त्याचे दशक्रिया व तेराव्याचा विधीही करण्यात आले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरव यांच्यासाठी शंकर बैल कुटुंबातील सदस्य बनला होता. त्यामुळे तुपगावात त्याच्या नावाने नागरिकांनी सोशल मीडियावर ग्रुप तयार करून त्याचे फोटो, स्पर्धेतील सहभागाच्या आठवणी शेअर केल्या. इतकेच नव्हे तर ज्याठिकाणी बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याजागी चौथरा बांधून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असा शोकसंदेश लिहिण्यात आला आहे.