शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खोपाेलीत आणखी २१८ कोटींचे ड्रग्ज जप्त; रायगड पोलिसांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 09:35 IST

माेठे रॅकेट उजेडात येणार

खोपोली : खालापूर तालुक्यातील ढेकू गावात बंद कारखान्यात शनिवारी १०७ कोटींचा अमली पदार्थांचा साठा (माफेड्रोन ड्रग्ज) जप्त करून तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रविवारी होनाड गावातील एका गोदामातून १७४.५ किलो वजनाचे २१८ कोटी १२ लाख ५० हजारांचे अमली पदार्थ जप्त केले. आतापर्यंतच्या कारवाईत एकूण ३२५.४२ कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केल्याची माहिती कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दिली.  

मौजे ढेकू गावात अंचल केमिकल कंपनी आहे. ही कंपनी बंद असून येथे अमली पदार्थ साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शुक्रवारी पोलिसांनी कारवाई करत ८५ किलो २०० ग्रॅम वजनाचे १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपयांचे अमली पदार्थ, त्यासाठी वापरलेला कच्चा माल जप्त केला आहे. 

चरस: निवृत्त पोलिसासह नातेवाइकांवर कारवाई

अलिबाग : नवी मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत कारवाई करीत निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाइकासह अन्य साथीदार यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तीन किलोच्या आसपास चरस नामक अमली पदार्थ जप्त केला आहे. नवी मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकास रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चरसची खरेदी - विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे याबाबत खात्री करीत पोलिसांनी छापा मारत रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काही इसमांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस