शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जाती-जातीत तेढ वाढवू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाव न घेता भुजबळांना कानपिचक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 13:22 IST

Ajit Pawar: आपल्या अधिकारांबाबत जरूर बोला, पण बोलताना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिल्या. 

कर्जत -आपल्या अधिकारांबाबत जरूर बोला, पण बोलताना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, जाती-जातीत तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना दिल्या.

लोकांची कामे करायची तर निधी हवा. त्यासाठी सत्ता हवी. परिस्थितीनुसार काही निर्णय घ्यावे लागतात, असे सांगत त्यांनी महायुतीत सहभागी होण्याचे समर्थन केले. काहींनी ऐकले, काहींनी ऐकले नाही. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पक्षांबरोबर जातात, पण विचारधारा सोडत नाहीत. तसेच आम्ही केल्याचे ते म्हणाले. कर्जत - खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण, रोड शो नंतर निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आदी उपस्थित होते.

घारेंचा निर्णय लोकसभेनंतरया भागातील बंद उद्योग सुरू करणे, अस्मानी संकटात मदत करण्याचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवन, तसेच मुलींसाठी हॉस्टेलचा संकल्प आहे. हलक्या कानाचे होऊ नका. जे असेल ते तोंडावर सांगा. विरोधाला विरोधाची भूमिका माझी काल नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. राजकीय आजार होण्याइतका मी लेचापेचा नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यास बांधीलही नाही. तुम्ही सुधाकर घारेंसाठी घोषणा देताय, ते लक्षात आले. पण, ते लोकसभा निवडणुकीनंतर होणार आहे, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.

सुधाकर घारे हे नवे नेतृत्व तयार होत आहे. अजित पवार नक्कीच सहाव्या मजल्यावर बसतील. ते ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ आहेत. येथील दरडग्रस्त गावांसाठी ते चांगले निर्णय घेतील. घारेंना रायगडमध्ये रायगडचे नेतृत्व आपण करायचे आहे. कर्जतला शिबिर झाले की पक्षाची गौरवशाली वाटचाल सुरू होते, याकडे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी लक्ष वेधले. येणाऱ्या निवडणुकीत दादांचा निर्णय किती योग्य आहे ते दिसेल, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रास्ताविकात अजितदादा मुख्यमंत्री होतील, तो दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस असेल अशी भावना व्यक्त केली.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChhagan Bhujbalछगन भुजबळreservationआरक्षण