जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हा बदल्या

By निखिल म्हात्रे | Published: January 17, 2024 01:59 PM2024-01-17T13:59:20+5:302024-01-17T14:00:06+5:30

बदल्यांची आर्डर मिळताच काही पोलीस अधिकारी पसंतीच्या शहरात बदलीची ‘सेटिंग’ लावत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

District transfers of four officers in the District Police Force | जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हा बदल्या

जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हा बदल्या

अलिबाग - आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे आचारसंहिता लागण्याची धाकधूक सुरु झाली आहे. त्यामुळे गृह विभागाने सतर्कता दाखवत जिल्हाबाहेर बदलीच्या कक्षेत असलेले आणि आचार संहिताच्या नियमात बसणाऱ्या रायगड जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी रात्री झाल्या आहेत. तर तीन पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस अधिकाक्षकांच्या शिफारशीनुसार अकार्यकारी पदावर ठेवण्यास मान्यता दिली आहे. बदल्यांची आर्डर मिळताच काही पोलीस अधिकारी पसंतीच्या शहरात बदलीची ‘सेटिंग’ लावत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य पोलीस दलातील प्रत्येक जिल्ह्यात, आयुक्तालयात एकाच शहरात पाच पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी किंवा एकाच विभागात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना असतात. निवडणुकींवर प्रभाव पडू नये म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. भारतीय निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक कार्यालयाला काही सूचना दिल्या होत्या. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भातही विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्या बदल्या आता पुर्ण झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक केरूभाऊ कोल्हे, कल्याण शाखेचे राजेंद्र तेंडूलकर, नियंत्रण कक्षाचे  बाळा कुंभार, रोहा पोलिस ठाण्याचे प्रमोद बाबर या चौघांची बदली ठाणे ग्रामिण येथे झाली आहे. तर पालघर येथील सुधीर संखे, ठाणे ग्रामिण येथील प्रसाद पांढरे, रमेश तडवी यांची बदली रायगड जिल्हा पोलिस दलात झाली आहे. कोकण परीक्षेत्रीय पोलिस अस्थापना मंडळाने बदलीस पात्र ठरणाऱ्या  निशस्त्र पोलिस निरीक्षक अशोक थोरात, तानाजी नारनवर, अश्वनाथ खेडकर यांना सध्याच्या घटकात  पोलिस अधिकाक्षकांच्या शिफारशीनुसार अकार्यकारी पदावर ठेवण्यास मान्यता दिली आहे.

कार्यालयात अंतर्गत बदल्यांच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभाग तयारी करीत असून वरिष्ठ अधिकारीही अलर्ट मोडवर आले आहेत.

Web Title: District transfers of four officers in the District Police Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.