लसीकरणासाठी जिल्हा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:30 IST2018-11-26T23:29:35+5:302018-11-26T23:30:04+5:30
जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राज्यात मंगळवार, २७ नोव्हेंबरपासून मिझेल रुबेला मोफत लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी जिल्हा सज्ज
अलिबाग : जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राज्यात मंगळवार, २७ नोव्हेंबरपासून मिझेल रुबेला मोफत लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. ९ महिने ते १५ वर्षे या वयोगटातील बालकांना ही लस दिली जाणार आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल ७ लाख ९३ हजार ४५१ बालकांचे लसीकरण या अभियानांर्गत होणार असल्याची माहिती सोमवारी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसत्र) डॉ. अमोल भुसारे, जागतिक आरोग्य संघटनेचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. जय निमावत उपस्थित होते.
लसीकरणासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा व अन्य सर्व शासकीय विभाग सज्ज झाले आहेत. मंगळवार, २७ नोव्हेंबरपासून रायगड जिल्ह्याच्या शहरी भागांतील शाळांमध्ये शाळेच्या कालावधीत तर ११ डिसेंबरपासून बाह्यसत्रामध्ये गोवर-रु बेला लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
लहान मुलांमधील गोवर, रुबेला यासारख्या आजारांना आळा घालण्यासाठी लसीकरण हे सुरक्षित व सर्वात प्रभावी माध्यम आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्र माच्या अंमलबजावणीद्वारे लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या आजारांचा प्रभाव रोखणे व त्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.
भविष्यात लसीकरणाद्वारे टाळता येणारे रोग कमी करण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्र म प्राधान्याने राबविणे आवश्यक आहे. लहान मुलांना १ वर्षापर्यंत बी.सी.जी.लसीची एक मात्रा, पेंटाव्हॅलेंट लसीचे ३ व पोलिओ प्रतिबंधासाठी प्रत्येक ३ मात्रा आणि गोवरची १ मात्रा यास संपूर्ण लसीकरण म्हटले जाते. त्यायोगे मुलांना सदृढ आयुष्य जगता येते. कोणताही रोग होण्याअगोदर त्याला रोखल्यामुळे आर्थिक नुकसान, श्रम व प्राणहानी टळते.
लहान वयाच्या मुलांच्या मृत्यूचे गोवर हे प्रमुख कारण आहे. गोवर साथीचा आजार असून साथ आल्यास मोठ्या प्रमाणावर रु ग्ण आढळतात. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणावर रु ग्ण आढळतात. मे २००३ साली जागतिक आरोग्य संघटनेने गोवर या रोगामुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे ठरविले. २००५ साली भारत सरकारने गोवर नियंत्रण कार्यक्र माची रूपरेषा ठरविली.
अलिबाग नगरपालिका शाळेत लसीकरणाचा शुभारंभ
जिल्ह्यातील लसीकरणाचा मुख्य कार्यक्र म मंगळवारी अलिबाग शहरात नगर पालिकेच्या शाळा क्र मांक ४ मध्ये सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेसंदर्भात जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर जनजागृती करण्यात आली असून प्रत्येक शाळेत शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन तज्ज्ञांनी जाऊन केले आहे. तसेच त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. हे लसीकरण पूर्णत: विनामूल्य आहे.
१३४ पथकांमार्फत शाळाबाह्य मुलांचे लसीकरण
जिल्हाभरात ४६१० शाळांमध्ये लसीकरण होईल. याशिवाय २९१० नियमित सत्रांमध्ये लसीकरण होईल. तसेच १६८६ सत्र ही आरोग्य केंद्रे, रु ग्णालये आदी ठिकाणी राबविले जातील. असे एकूण जिल्ह्यात ९६४० लसीकरण सत्र होतील.
जिल्हाभरात १३४ पथकांमार्फत शाळाबाह्य मुलांपर्यंत पोहोचून लसीकरण केले जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांनी दिली.
शहरी भागातील २५६ शाळांमध्ये लस देणार
मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अलिबाग, उरण,पनवेल, महाड, कर्जत, पेण, रोहा, श्रीवर्धन, मुरु ड, खोपोली, माथेरान या शहरी भागातील कार्यक्षेत्रातील १ लाख ८७ हजार ३७८ बालकांना गोवर-रु बेलाची लस देण्यात येणार आहे, तर ग्रामीण भागातील ६ लाख ६ हजार २०६ बालकांना अशा एकूण ७ लाख ९३ हजार ४५१ बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचे लसीकरण करून होणार आहे. दुसºया टप्प्यात ११ डिसेंबरपासून बाह्यसत्रात शाळांव्यतिरिक्त अन्य बालकांपर्यंत हे लसीकरण पोहोचविले जाणार आहे. शहरी भागातील २५६ शाळांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. मोहीम यशस्वी करण्याकरिता शाळेमध्ये ६४८, बाह्यसत्रामध्ये ४२८, विशेष टीमद्वारे ३३ तसेच आरोग्य संस्थेमध्ये ३२४ अशी एकूण १४३३ सेवा सत्राद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.