शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जिल्ह्यात साकारले सामाजिक संदेश देणारे देखावे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 1:34 AM

जगाच्या नकाशावर असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते

मोहोपाडा : नारपोली येथील रोशन शिवराम म्हस्कर यांनी आपल्या निवासस्थानी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून बनविलेला आकर्षक देखावा साकारला आहे. या देखाव्यात रोशनने सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली देत एकमेकांना सहकार्य करावे, असा संदेश दिला आहे. शिक्षणक्षेत्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाल्याला शिकविण्याकडे पालकांचा कल असतो, त्यामुळे मराठी शाळांतील पटसंख्या कमी होत आहे. आपण मराठी शाळांत शिक्षण घेऊनच डॉक्टर, इंजिनीअर झालो हे आज विसरलो आहोत. यासाठी हसत खेळत मराठी शिकू या, मराठी वाचवा, तसेच स्त्रीभ्रुण हत्या थांबवा, हा संदेश देणारा देखावा रोशनने साकारला आहे.नेरळ : जगाच्या नकाशावर असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. नेरळ रेल्वेस्टेशनवरून माथेरानला जाण्यासाठी मिनीट्रेनने प्रवास करावा लागतो. ही मिनीट्रेन नेरळवरून सुटल्यानंतर पहिले स्टेशन लागते जुमापट्टी. हा जुमापट्टी परिसर वर्षासहलीसाठी प्रसिद्ध आहे. याच जुमापट्टी परिसराचा आणि मिनीट्रेन रेल्वेस्थानक देखावा साकारून नेरळ -टेपआळी येथे विक्रांत आहिर आणि विशाल आहिर यांनी गणेशाची सुबक मूर्तीची स्थापना केली आहे. हा देखावा भक्तांसाठी आकर्षण केंद्र बनले आहे. नेरळ शहरासह कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घरोघरी गणपती-गौरीची स्थापना करण्यात आली आहे. थर्माकोल बंद झाल्याने अनेक ठिकाणी फुलांचे डेकोरेशन तर काही ठिकाणी देखावे साकारून गणेशमूर्ती तसेच गौरीची स्थापना करण्यात आली आहे. हेच देखावे गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.कोकणात गणेशोत्सवाला फार महत्त्व आहे. या काळात घरगुती गणेशासह, विविध गणेश मंडळे श्रीची स्थापना करून विविध उपक्रम राबवतात. यंदाही विविध मंडळांनी आकर्षक देखावे साकारले असून पर्यावरणपूरक अशी सजावट के ली आहे. या साकारलेल्या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे, असे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडGanpati Festivalगणेशोत्सव