शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत उमेदवाराच्या नावाने लिंबू टाकल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 00:10 IST

माणगावमधील हातकणंगले येथील प्रकार

माणगाव : माणगाव तालुक्यातील हातकणंगले येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून वापरण्यात आलेले अंगारा, नारळ, लिंबूचा प्रकार संपतो ना संपताे तोच पराभूत उमेदवार व समर्थक यांच्या नावाने लिंबू प्रभागात टाकल्याने हे प्रकरण हातघाईवर आले.येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवाराचा पराभव व्हावा या हेतूने येथील दोन्ही गटांकडील उमेदवारांनी यंत्र तंत्र, भानामती, उमेदवाराच्या दारात लिंबू कापून टाकणे, नारळ फोडणे, गावाभर तांदूळ फेकणे, गल्लीबोळात अंगारा टाकणे असे प्रकार झाले असून ज्या उमेदवारांच्या नावाने भानामती करण्यात आली होती त्याच्यातून उतराई होण्यासाठी येथील एका गल्लीत पराभव झालेल्या उमेदवार व त्याचे समर्थक यांच्या नावाने लिंबू कापून फेकण्यात आले होते, हा प्रकार प्रभागात समजताच महिला भयभीत होऊन शिव्यांची लाखोली वाहू लागल्या. यामध्ये संशयित व्यक्तीच्या नावाने शिव्या दिल्याने त्याचे रूपांतर वादात झाले. वाद विकोपास जाताच दोन्ही गटांकडील नागरिक एकत्रित आल्याने बाचाबाची व हातघाईवर प्रकरण आले. दरम्यान, या ठिकाणी ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांच्या समझोत्याने व हातकणंगले पोलीस स्टेशनचे अधिकारी येताच येथील वाद मिटविण्यात आले.लज्जास्पद प्रकार, ग्रामस्थांचे मतमाणगाव या गावामध्ये प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात तांदूळ, अंगारा, लिंबू कापून टाकणे, उमेदवारांच्या दारात मध्यान्ह रात्री नारळ फोडणे हे प्रकार अंधश्रद्धेतून केले जातात. गावात उमेदवाराच्या समक्ष हा प्रकार करणारी यंत्रणा असून माणगाव हे गाव पुरोगामी विचारांचे व शंभर टक्के सुशिक्षित तसेच शिक्षकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे असून या गावात हे प्रकार म्हणजे लज्जास्पद असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.