एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 06:50 IST2026-04-09T06:50:04+5:302026-04-09T06:50:56+5:30

या भांड्यांलगतच्या भागात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाकडून उत्खनन सुरू आहे.

Discovery of two huge storage jars in Elephanta excavations; adds to historical significance | एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर

एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण: एलिफंटा लेणी परिसरातील उत्खननात आणखी दोन मोठ्या साठवणुकीच्या भांड्यांचा शोध लागल्याने या स्थळाच्या ऐतिहासिक महत्त्वात भर पडली आहे. यापूर्वीच १५०० वर्षे जुन्या जलाशयासह अनेक दुर्मीळ अवशेष सापडले होते.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या पथकाकडून डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार महिन्यांपासून मोराबंदर परिसरात उत्खनन सुरू आहे. नव्याने सापडलेल्या भांड्यांपैकी एका भांड्याची उंची १.२५ मीटर, तर दुसऱ्या तुटलेल्या भांड्याचा व्यास १.२२ मीटर आहे. ही भांडी गोदामांच्या अवशेषांजवळ आढळल्याने त्यांचा वापर पाणी किंवा माल साठवण्यासाठी होत असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरात अँफोरा, टॉर्पेडो जारचे तुकडे, लोखंडी विटा, तसेच दगडी नांगरही सापडले आहेत. याशिवाय विटांच्या व खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आढळून आल्याने येथे कापड रंगवण्याचा उद्योग चालत असावा, असे संकेत मिळत आहेत.

रोम, पश्चिम आशियातील देशांशी व्यापार

या उत्खननातून रोम, पश्चिम आशिया आदी देशांशी असलेल्या प्राचीन व्यापारी संबंधांचेही पुरावे समोर येत आहेत, तसेच ४ थ्या-५ व्या शतकातील व्यापार, जलसंधारण तंत्र आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर प्रकाश पडत आहे. सापडलेल्या भांड्यांचे जतन व जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू असून, पावसाळ्यापूर्वी त्यांचे सुरक्षित ठिकाणी प्रदर्शन करण्याची तयारी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

Web Title : एलिफेंटा उत्खनन में प्राचीन भंडारण जार मिले, ऐतिहासिक महत्व बढ़ा

Web Summary : एलिफेंटा गुफाओं की खुदाई में मोराबंदर के पास दो बड़े भंडारण जार मिले, जो रोम और पश्चिम एशिया के साथ प्राचीन व्यापार संबंधों का संकेत देते हैं। मिट्टी के बर्तनों के टुकड़े और पानी की टंकियों सहित निष्कर्ष, चौथी-5वीं शताब्दी से रंगाई उद्योग और उन्नत जल संरक्षण तकनीकों का सुझाव देते हैं। कलाकृतियों को संरक्षित और प्रदर्शित किया जाएगा।

Web Title : Elephanta Caves Excavation Unearths Ancient Storage Jars, Boosting Historical Significance

Web Summary : Elephanta Caves excavation reveals two large storage jars near Morabandar, indicating ancient trade links with Rome and West Asia. The finds, including pottery shards and water tanks, suggest a dyeing industry and advanced water conservation techniques from the 4th-5th centuries. Artifacts will be preserved and displayed.