शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
4
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
5
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
6
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
7
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
8
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
9
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
10
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
11
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
12
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
13
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
14
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
15
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
16
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
17
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
19
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
20
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न

शिवरात्रीनिमित्त भाविकांची मांदियाळी, शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:59 IST

शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले

महाड : महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. शुक्रवारी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. गुरु वारपासून वीरेश्वर छबिना उत्सवाला सुरुवात झाली. शुक्रवारी महाशिवरात्रीला महाडची ग्रामदेवता जाखमातादेवी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे वीरेश्वराच्या भेटीला वाजतगाजत मिरवणुकीने आली.शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने फुललेआगरदांडा : मुरूड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथील शिवमंदिरात व टेकडीवर असणाऱ्या क्षेत्रपाल मंदिरात ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या गजरात शिवभक्तांनी आपल्या आराध्य दैवतेचे दर्शन घेण्यासाठी गर्दीके लीहोती. शिवपिंडीवर भक्तांकडून दुग्धाभिषेक करण्यात आला.बोर्ली-मांडला : मुरूड तालुक्यातील प्राचीन पांडवकालीन असलेल्या काशिद ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे येथील कावड्याच्या डोंगरावर वसलेल्या सर्वेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली. तहसीलदार गमन गावित यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शिवपिंडीचे दर्शन घेतले. सकाळी शिवपिंडीची विधिवत पूजा-अर्चा, आरती करण्यात आली. यानिमित्ताने श्री शिवलीलामृत ग्रंथवाचन, भाविकांसाठी सुश्राव्य बहारदार भजन आदी कार्यक्रम पार पडले.कर्जत : महाशिवरात्री असल्याने कर्जत तालुक्यातील महादेवाच्या प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बहुतांश मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री ९ वाजेपर्यंत कर्जतकरांनी पालखीतील कपालेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात ह. भ. प. श्रीराम पुरोहित यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त पहाटे पुणे येथील महादेव तुपे बंधू यांचे सनईवादन, श्री कपालेश्वराची महापूजा करण्यात आली. लघुरुद्र अभिषेक त्यानंतर सामूहिक शिवलीलामृत पारायण झाले. पहाटेपासून श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी श्री कपालेश्वराची पालखी मिरवणूक ढोल-ताशा पथकाच्या गजरात काढण्यात आली.देवघर येथील श्री अमृतेश्वर मंदिरात गर्दीम्हसळा : तालुक्यातील मौजे देवघर येथील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पांडवकालीन स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिरामध्ये शुक्रवारी महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध धार्मिक कायक्रम झाले. तसेच जंगमवाडी येथील शिवमंदिर हेदेखील प्राचीन आहे. मुघलकाळामध्ये प्रार्थनेकरिता कोणतेही मंदिर जवळपास नसल्याने या मंदिराची स्थापना करण्यात आली. शिवाभिषेक करण्यासाठी भाविकांनी गर्दी के ली होती.मोहोपाडा : चौक तुपगाव येथील ३५० वर्षांहून पुरातन हेमाडपंथी श्री धान्येश्वर मंदिरात पारंपरिक व भक्तिभावाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. तुपगावमधील धान्येश्वर शिवालयात रात्रीपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. महाशिवरात्रीनिमित्त तुपगाव येथे मोठी यात्रा भरत असते. या ठिकाणी अमरनाथ मित्रमंडळातर्फे सर्व भाविकभक्तांना मोफत खिचडी व मोफत चहापानाची व्यवस्था केली होती. मनाचा राजा ग्रुप मंडळ तुपगाव यांच्या वतीने भाविकांना मोफत थंड पाण्याची व्यवस्था के ली होती.पनवेल : महाशिवरात्री देशभरात मोठ्या उत्साहात साजरी क रण्यात आली. पनवेलनजीक आपटा फाटा येथील शिवमंदिरात अभिनेता हृतिक रोशन यांनी सहकुटुंब हजेरी लावत शिवलिंगाचे दर्शन घेतले. आपटा फाटा येथील शिवमंदिराची उभारणी हृतिक रोशनचे आजोबा व राकेश रोशन यांचे वडील ओमप्रकाश यांनी केली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त आवर्जून हजेरी लावत असतात. तसेच दरवर्षी रोशन कुटुंबीय या ठिकाणी महाशिवरात्रीला उपस्थित राहत असतात. या वेळी हृतिक रोशनला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Raigadरायगड