शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास साधा; विरोध करणाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी ओढले कान   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 6:59 PM

प्री-वेडिंग शूटसाठी आलेले जोडपे हनिमून साजरे करण्यासह लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यासाठी रायगडात आले पाहिजेत. यातून पर्यटन वाढीला चालना मिळेल, अजित पवार यांचं वक्तव्य

ठळक मुद्देप्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास कसा साधता येईल याचा विचार करा : अजित पवार

रायगड : ऐतिहासिक स्थळांवर प्री-वेडिंग शूट करण्यावरुन मध्यंतरी बराच वादंग निर्माण झाला होतात. मात्र प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन स्थळांचा विकास साधण्याबाबत प्रशासनाने विचार करावा, अशी सूचना करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्री-वेडिंग शूटला विरोध करणाऱ्यांचे कान ओढले आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघातील तब्बल २३ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपजन पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोललत होते."सध्या प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड आहे. लग्नाआधीच्या आठवणींसाठी विवाह बंधनात अडकणारे जोडपे असे चित्रिकरण करतात. प्री-वेडिंग शूटचा व्यवसाय आहे. त्यामुळे गड-किल्ले यावर प्री-वेडिंगचे शूटींग करताना त्यांना अडवू नका. प्री-वेडिंग शूटच्या माध्यमातून पर्यटन विकास कसा साधता येईल याचा विचार करा. त्याबाबत आवश्यक ती नियमावली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी एकत्रित तयार करावी. तसेच त्यासाठी काही शुल्कही आकारावे. प्री-वेडिंग शूटकडे उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पाहा," असा सल्ला पवार यांनी दिला.  

पवार यांच्या या सल्ल्यामुळे नजिकच्या कालावधीत समुद्रकिनारी, पर्यटन स्थळी प्री-वेडिंग शूट करणाऱ्या जोडप्यांना आणि शूटींग करणाऱ्यांना आता कोणतीही अडचण येणार नसल्याचे दिसून येते आहे .अनेकवेळा प्री-वेडिंग शूटिंगसाठी नियमावली नसल्याने भांडणाचे प्रसंग निर्माण होत असतात. त्यामुळे पोलिसापर्यंत हा विषय जातो आणि आर्थिक भुर्दंड पडतो. मात्र, त्यांना रितसर परवानगी दिल्यास हे वाद टाळले जातील असेही पवार यावेळी स्पष्ट केले. प्री-वेडिंग शूटला अभय द्या, प्री-वेडिंग शूट करणाऱ्या जोडप्याना अभय द्या,  प्री-वेडिंग शूटसाठी आलेले जोडपे हनिमून साजरे करण्यासह लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यासाठी रायगडात आले पाहिजेत. यातून पर्यटन वाढीलाही चालना मिळेल," असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaigadरायगडAditi Tatkareअदिती तटकरेtourismपर्यटन