शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
3
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
4
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
5
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
6
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
7
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
8
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
9
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
10
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
11
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?
12
या ३ मारुती कारची बाजारात धूम, शोरूममध्ये पोहोचण्यापूर्वीच खरेदी करतायत लोक!
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२४ : कौटुंबिक जीवनात आनंद राहील, नोकरीत पदोन्नती संभवते
14
विशेष लेख: पाशवी आकडे नको, सहमती आणि संवाद हवा!
15
T20 WC 2024 : न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून टीम इंडियाचे स्वागत; पाहा PHOTOS
16
रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार, आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी प्रक्रिया
17
AUS vs NAM : ऑस्ट्रेलियाने अवघ्या ५.४ षटकांत मिळवला 'मोठ्ठा' विजय; सुपर-८ चे तिकीट कन्फर्म
18
Monsoon: आभाळमाया बरसली, शेत-शिवारं भिजली, मान्सूनची जळगाव, अकोल्यापर्यंत धडक
19
AUS vs NAM : नवख्या संघाला ऑस्ट्रेलियानं स्वस्तात गुंडाळलं; कांगारूंचा दबदबा कायम, झाम्पाचा 'चौकार'
20
दबाव असणार भारतावरच, यजमानांना गृहीत धरणे धोक्याचे;अमेरिकेकडे गमावण्यासारखे काहीच नाही

पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली, भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:12 AM

हमीभाव न मिळाल्याने कांदा अनेकदा शेतक-यांच्या डोळ््यात पाणी आणतो, तर भाव वाढला की ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते.

जयंत धुळप  अलिबाग : हमीभाव न मिळाल्याने कांदा अनेकदा शेतक-यांच्या डोळ््यात पाणी आणतो, तर भाव वाढला की ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते. पण रायगड जिल्ह्यातील विशेषत: अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा सध्या सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. चवीला गोड आणि औषधी गुणधर्मामुळे सध्या पांढरा कांद्याची ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. चांगल्या बाजारभावामुळे पांढरा कांदा उत्पादक शेतकरीही सुखावले आहेत.अलिबागकडून पेणला जाताना रस्त्याच्या दुतर्फा सध्या पांढºया कांद्यांच्या माळांनी बाजारपेठ काबीज केली आहे. आम्लपित्तावर अत्यंत गुणकारी, पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करणारा, गोड, रु चकर अशी या कांद्याची खासियत आहे.लाल कांदा बाजारात सुटा उपलब्ध असतो, परंतु पांढºया कांद्याच्या विणलेल्या माळा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या माळा घरात एक बाजूला हवेशीर बांधून ठेवल्या की त्या वर्षभर टिकतात. सध्या मोठ्या पांढºया कांद्याची माळ १६० रुपयांना तर लहान पांढºया कांद्याची माळ १२५ रुपयांना विकली जात आहे.कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अन्य भागातही पांढºया कांद्याचे उत्पादन होते, परंतु अलिबाग तालुक्यात लागवड होणाºया पांढºया कांद्याची चव, गुणधर्म वेगळेच असून किमतीतही फरक आहे. कोकणात येणारे प्रवासी, पर्यटक, मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारे प्रवासी आवर्जून गाडी थांबवून कांद्याच्या माळ खरेदी करताना दिसतात.तालुक्यात २३० हेक्टरवर पांढºया कांद्याची लागवडअलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, पवेळे, सहाण व ढवर या गावांमध्ये हा पांढरा कांदा मोठ्या प्रमाणात होतो. पूर्वी फक्त अलिबाग तालुक्यातच या कांद्याची लागवड केली जात असे. मात्र आता पेण, महाड, रोहा, माणगाव, कर्जत या तालुक्यांमध्ये शेतकºयांनी या पांढºया कांद्याची लागवड सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यात २५० हेक्टर क्षेत्रावर पांढºया कांद्याची लागवड करण्यात आली आहे. त्यातील सर्वाधिक लागवड क्षेत्र अलिबाग तालुक्यात २३० हेक्टर आहे.गादी वाफा पद्धतीने लागवड१खरिपातील भाताची कापणी झाल्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पांढºया कांद्याची लागवड शेतातील नैसर्गिक ओलाव्यावर शेतकरी करतात. अडीच ते तीन महिन्यांत पांढºया कांद्याचे पीक तयार होते. जितका पाऊस जास्त तितकी कांद्याची लागवड अधिक असे कांद्याचे सूत्र शेतकरी सांगतात. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. याबाबत कृषी विभागामार्फत शेतकºयांना वेळोवेळी माहिती देत असल्याने बरेच शेतकरी आता गादी वाफा पद्धतीने कांदा लागवडीकडे वळत आहेत. या पद्धतीने कांदा लागवड केल्यामुळे कांद्याचा आकार मोठा होतो. साहजिकच चांगला भाव मिळतो. कृषी विभागाकडून उत्पादन वाढवण्यासाठी अनेक उपक्र म राबविले जात आहेत.बियाणांची निर्मिती अपेक्षित२कांद्याची लागवड अद्याप पारंपरिक पद्धतीने आणि मर्यादित स्वरूपातच होते आहे. पांढºया कांद्याची लागवड सहकारी व्यावसायिक तत्त्वावर केल्यास अधिक शेतकºयांना आर्थिक लाभ होवू शकतो. त्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून पांढºया कांद्याच्या बियाणांची निर्मिती आणि पाऊस थांबल्यावर शेतकºयांना बियाणे उपलब्ध करून दिल्यास, हा पांढरा कांदा रायगडमधील शेतकºयांच्या आर्थिक परिवर्तन करेल, असा विश्वास कांदा उत्पादक शेतकºयांचा आहे.