बर्फ व्यवसायाला उतरती कळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 02:04 IST2019-05-09T02:03:04+5:302019-05-09T02:04:39+5:30
मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे.

बर्फ व्यवसायाला उतरती कळा
पोलादपूर : मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. याकरिता शरीराला थंडावा मिळवण्यासाठी तसेच शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी थंड पाणी आणि शीतपेय यांच्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र, घरोघरी फ्रीजचा वापर वाढल्याने बर्फ व्यवसायाला उतरती कळा आली आहे.
रसायनी परिसरातील मोहोपाडा मिनीडोर थांब्याजवळ गेल्या ३६ वर्षांपासून बर्फ विक्रीचे दुकान आहे. सध्या घरोघरी फ्रीजचा वापर होत असल्याने या व्यवसायाला उतरती कळा आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, काही वर्षांअगोदर रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील रिलायन्स, बकुळ, एचओसी आदी कंपनीत बर्फ पुरवठा करण्याचे काम होत असे; परंतु प्रत्येक कंपनीत कुलिंगप्लँट असल्यामुळे आपल्या बर्फ व्यवसायाला उतरती कळा आली आहे.
शिवाय एप्रिल ते मे महिना वगळता इतर महिन्यात बर्फाला अधिक मागणी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या साखरपुडा, लग्नसमारंभ, ज्युस सेंटर, रसवंती यांच्याकडून मागणी आहे. सगळीकडे फ्रीजचा वापर वाढल्याने बर्फाची मागणी कमी झाली आहे.