शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दोषसिद्ध आरोपींना फाशी द्यावी, दिवेआगर सुर्वण गणेश दरोडा आणि दूहेरी खून प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 21:51 IST

सुवर्ण गणेशाच्या मुर्तीची दरोडा टाकून दोन निष्पाप सुरक्षारक्षकांचा लोखंडी पहारीने अत्यंत निर्घृणपणे खून करणे असा हा अत्यंत गंभीर गुन्हा  समाजमनाला धक्का बसणारा

रायगड- सुवर्ण गणेशाच्या मुर्तीची दरोडा टाकून दोन निष्पाप सुरक्षारक्षकांचा लोखंडी पहारीने अत्यंत निर्घृणपणे खून करणे असा हा अत्यंत गंभीर गुन्हा  समाजमनाला धक्का बसणारा असाच होता. ‘रेअरेस्ट ऑफ दि रेअरेस्ट’ अशा या गुन्ह्यात आरोपींना भा.द.वी.कलम 396 अन्वये फाशी शिक्षा द्यावी असा युक्तीवाद सुनावणी दरम्यान आणि आज निकालपूर्व अंतिम सूनावणीत देखील केला होता अशी माहिती या निकालाच्या निमीत्ताने हा खटला चालवणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रसाद शांताराम पाटील यांनी दिली. आरोपींच्या शिक्षेत वाढ होण्याकरीता तसेच मोका अंतर्गत शिक्षा होण्याकरीता अपील दाखल करण्याची विनंती आपण शासनास करणार असल्याचे अॅड.पाटील यांनी सांगीतले. दरम्यान या खटल्याची सूनावणी 28 डिसेंबर 2015 रोजी विशेष मोक्का न्यायाधिश किशोर पेठकर यांच्या न्यायालयासमोर सुरु झाली. सरकार पक्षाच्यावतीने  एकूण 104 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्याचे अॅड.पाटील यांनी अखेरीस सांगीतले. दरम्यान, पाेलिसांनी तपासादरम्यान परत मळवीलेले सुवर्ण गणेशाचे साेने सरकार जंमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 जिल्हा न्यायालयातील मोक्का विशेष न्यायालयाचे न्यायाधिश किशोर पेठकर यांनी विविध कलमान्वये दाेषी ठरवून १२ आराेपींपैकी पाच जणांना मृत्यूपर्यंत जन्मठेप, तीन महिला आराेपींना १० वर्ष सक्तमजूरी ,दाेघांना ९ वर्ष सक्तमजूरी अशी शिक्षा साेमवारी संध्याकाळी निकाल देताना सुनावली आहे. दरम्यान दाेघा आराेपींना दाेषमुक्त करण्यात आले आहे.

मृत्यूपर्यंत जन्मठेप  व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा झालेल्या पाच जणांमध्ये  नवनाथ विक्रम भोसले(32,रा.घोसपुरी,अहमदनगर), कैलास विक्र म भोसले (29, रा.घोसपुरी, अहमदनगर),छोट्या उर्फ सतीश जैनु काळे (25, बिलोणी,औरंगाबाद),विजय उर्फ विज्या बिज्या काळे (28,श्रीगोंदा,अहमदनगर),  ज्ञानेश्वर विक्र म भोसले (34,घोसपुरी,अहमदनगर) यांचा समावेश असल्याची माहिता सरकार पक्षाकडून हा खटला चालवणारे रायगड जिल्हा सरकारी वकील अॅड.प्रसाद शांताराम पाटील यांनी दिली. दरम्यान १० वर्ष सक्तमजूरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा झालेल्या तिन महिलांमध्ये खैराबाई विक्र म भोसले (56,घोसपूरी,अहमदनगर),  कविता उर्फ कणी राजू काळे (44,हिरडगाव,श्रीगोंदा,अहमदनगर) आणि सुलभा शांताराम पवार(56,श्रीगोंदा,अहमदनगर) यांचा समावेश आहे. दराेड्यात चाेरुन आणलेल्या सुवर्ण गणेशाचे साेने घेणारे आनंद अनिल रायमोकर (38,बेलंवडी,श्रीगोंदा,अहमदनगर) व  अजित अरु ण डहाळे (28,श्रीगोंदा,अहमदनगर) या दाेघा साेनारांना ९ वर्ष सक्तमजूरी  व प्रत्येकी ५०० रुपये दंड अशी शिक्षा सूनावली असल्याचे अॅड.पाटील यांनी पूढे सांगीतले. 

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुप्रसिध्द सुवर्ण गणेश मंदिरात ही घटना २४ मार्च २०१२ रोजी रात्री ही घटना घडली. मंदिराचे पहारेकरी महादेव घडशी आणि अनंत भगत या दोघांचा लोखंडी पहारींनी खून करुन सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटून नेला होता. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशनमध्ये १२ जणांविरुध्द भादंवि कलम ३९६, ३९७, १२० ब, २०१, ४१२ आणि महाराष्ट्र राज्य संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा १९९९ अर्थात मोक्काच्या कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.श्रीवर्धनचे तत्कालीन पोलीस उप विभागीय अधिकारी व नाशिक ग्रामीण पोलीसचे विद्यमान अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, दिघा सागरी पो. ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व इगतपुरी (नाशिक) पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन आॅक्टोबर २०१२ मध्ये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयRaigadरायगड