बिरवाडीमध्ये शिवशाही बसच्या धडकेने पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:44 IST2018-06-01T15:44:46+5:302018-06-01T15:44:46+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसची ठोकर लागून एक अनोळखी पादचारी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

बिरवाडीमध्ये शिवशाही बसच्या धडकेने पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू
महाड: राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसची ठोकर लागून एक अनोळखी पादचारी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. जळगाव महाड ही शिवशाही बस महाडला परतत असताना बिरवाडी पोलीस चौकीसमोर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचाऱ्याला या बसची धडक बसली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृताची ओळख पटली नसून याबाबत सचिन बागडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या अपघातप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आबासोबत पाटील यांनी घटनास्थळी त्वरित भेट दिली.