कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:38 IST2020-06-02T23:37:52+5:302020-06-02T23:38:09+5:30

१६ जणांवर उपचार सुरू : कर्जत तालुक्यात १२ रुग्णांची मात

Death of a corona positive woman | कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू

कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून या दरम्यान केवळ एक नवीन महिला रुग्ण आढळून आली आहे. मात्र या वयस्कर महिलेचा रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला.


तालुक्यातील तब्बल १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजच्या तारखेला १६ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.


कर्जत तालुक्यातील शहरी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मे महिन्याच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यात एकट्या कर्जत शहरात १० तर माथेरान शहरात ६ रुग्ण आहेत तर ग्रामीण भागात १२ रुग्ण होते. सोमवारपर्यंत १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पनवेल, कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि इंडिया बुल्स कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एकूण २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नऊ रुग्ण हे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर तीन वयोवृद्ध रुग्णांना कोरोनासह अन्य व्याधी त्यांना असल्याने त्यांचे बळी गेले आहेत. मात्र मागील तीन दिवसात केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कर्जत तालुक्यात आढळून आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. कर्जत शहरातील सुयोगनगर येथे शेवटचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

Web Title: Death of a corona positive woman