शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

साहसी ट्रेकिंग ठरतेय धोकादायक

By admin | Updated: October 13, 2015 02:03 IST

तरुणाईमध्ये सध्या ट्रेकिंग, साहसी खेळांची क्रेझ वाढली आहे. गड-किल्ले, टेकड्या, डोंगर दऱ्यातून मार्गक्रमण करायचे आणि सेल्फी सोशल मीडियावर तत्काळ अपलोड करायचे

वैभव गायकर, पनवेलतरुणाईमध्ये सध्या ट्रेकिंग, साहसी खेळांची क्रेझ वाढली आहे. गड-किल्ले, टेकड्या, डोंगर दऱ्यातून मार्गक्रमण करायचे आणि सेल्फी सोशल मीडियावर तत्काळ अपलोड करायचे, हे एक फॅड बनले आहे. मात्र हे फॅड जीवघेणे ठरू शकते, हे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून लक्षात येते. आठवड्याभरापूर्वी नवीन पनवेलमध्ये राहणारा समरेश मंडल हा २६ वर्षीय तरुण माथेरान येथे ट्रेकिंगसाठी गेला. मात्र परतीच्यावेळी जंगलात रस्ता भरकटल्याने तिथेच अडकून पडला. अशा ठिकाणी बऱ्याचदा मोबाइलला रेंज मिळत नाही. मात्र दैव बलवत्तर म्हणून समरेशचा त्याच्या पालकांशी संपर्क झाला आणि पोलिसांच्या मदतीने त्याची शोधण्यात यश आले. या घटनेनंतर तरु णांमधील ट्रेकिंगची क्रेझ कशी जीवावर बेतू शकते, हे पहायला मिळाले. दिवसभर भटकंती केल्याने चक्कर आल्याने समरेश खाली पडला होता. त्यातच जर मोबाइल बंद पडला असता, अथवा संपर्क झाला नसता तर त्याच्या जीवावरही बेतले असते. पनवेल परिसरातील सह्याद्रीच्या पर्वत रांगा, खारघरचे पठार, कर्नाळा किल्ला आदी ठिकाणी ट्रेकर्स भेट देत असतात. मात्र अनेकदा उत्साहाच्या भरात चुकीचे मार्गक्र मण करून रस्ता भरकटतात. काही महिन्यांपूर्वी कर्नाळा किल्ल्यातही असाच प्रकार घडला होता. याठिकाणी फिरायला गेलेले एक दोघे रस्ता भरकटले होते. माथेरानसारख्या हिल स्टेशनवर ट्रेकिंगला जाण्यासाठी समरेशने धोदाणी मार्गाचा पर्याय निवडला. मात्र यावेळी पुरेशी सुरक्षा साधनसामग्री त्याने सोबत बाळगली नाही. ट्रेकिंगचा बेत सहसा एकट्याने करू नये, अथवा करीत असल्यास सुरक्षेसाठी चाकू, रोप, टॉर्च, पुरेसे पाणी, खाण्याचे सामान जवळ बाळगण्याचा सल्ला नियमित ट्रेकिंगला जाणाऱ्यांकडून दिला जातो.