शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर टंचाईने हिसकावला भाविकांच्या तोंडचा महाप्रसाद; पालीच्या श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:45 IST

प्रसादाचा लाडूदेखील मिळत नसल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

विनोद भोईर -

पाली :  पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने अष्टविनायक गणपती मंदिर ‘श्री बल्लाळेश्वर देवस्थान’चे अन्नछत्र सद्य:स्थितीत बंद झाले आहे. प्रसादाचा लाडूदेखील मिळत नसल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

साधारणतः दिवसा आणि रात्री मिळून ४०० भाविक श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या अन्नछत्रात अत्यल्प दरात महाप्रसादाचा लाभ घेतात. एप्रिल आणि मेच्या सुट्ट्यांमध्ये ही संख्या दिवसाला ८०० च्या वर जाते. मात्र, गॅसअभावी अन्नछत्र बंद झाले आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा नसल्याने आजूबाजूच्या हॉटेलमधील व्यवस्थाही कोलमडली आहे. जिथे व्यवस्था उपलब्ध आहे, तिथे भाविकांना अन्नछत्राच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त पैसे मोजावे लागत आहेत. केवळ भूक भागवणे हा उद्देश नसून देवस्थानचा सात्त्विक प्रसाद ग्रहण केल्याने मिळणाऱ्या मानसिक व आध्यात्मिक समाधानालाही भाविक मुकले आहेत.

शासकीय मदतीची अपेक्षाअन्नछत्रासोबतच देवस्थानचा प्रसादाचा लाडू भाविकांमध्ये अत्यंत प्रिय आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात लाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा होत नसल्याने हे उत्पादनही थांबले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने देवस्थानला व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

देवस्थानतर्फे अवघ्या ३० रुपयांमध्ये भाविकांना मुबलक भोजन दिले जाते. सेवाभावी वृत्तीने चालवला जातो. व्यावसायिक गॅसपुरवठा बंद असल्याने अन्नछत्र चालविता येत नाही. शासनाने व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध केल्यास सेवा सुरू करता येईल. जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, श्री बल्लाळेश्वर देवस्थान

आम्ही दरवर्षी अष्टविनायक दर्शनासाठी येतो. बल्लाळेश्वराचा महाप्रसाद घेतल्याशिवाय आमची यात्रा पूर्ण होत नाही. मात्र, आता अन्नछत्र बंद असल्याने बाहेर महागड्या हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने लवकरात लवकर गॅसचा पुरवठा करून हे अन्नछत्र सुरू करावे.    प्रदीप  खेरटकर, भाविक, ठाणे  

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Shortage Closes Ballaleshwar Temple's Free Food Service, Disappointing Devotees

Web Summary : Due to gas cylinder shortages linked to West Asia conflicts, the Ballaleshwar temple's free food service is closed. Devotees face expensive alternatives, missing the affordable, spiritually significant 'Mahaprasad'. The temple seeks government help to restore gas supply and resume the service and laddu production.