शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

'काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराने श्रीमंत भारतातील नागरिक गरीब बनले'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 5:33 AM

नितीन गडकरी यांची टीका; अलिबागमध्ये युतीची प्रचारसभा

अलिबाग : देशावर राज्य करण्यासाठी काँग्रेसला ७० वर्षे मिळाली; परंतु काँग्रेसची चुकीची धोरणे आणि भ्रष्ट प्रशासनामुळे श्रीमंत भारत देशाचे नागरिक गरीब बनले; परंतु मोदी सरकारच्या काळात देश बदलत असून, देशाचा विकास होतो आहे. हा विकास असाच पुढे करायचा झाल्यास रायगडमधून महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना निवडून देण्याचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी अलिबागमध्ये केले.शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ येथील जयमाला गार्डनमध्ये आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते. एकमेकांना पाण्यात पाहणारे अनेक नेते या निवडणुकीसाठी एकत्र आलेले असून, या संधीसाधू नेत्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे सांगितले. कोकणातील पिण्याचे पाणी, रस्ते, रोजगार आणि पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पावले टाकलेली असून, कोकणातील उर्वरित विकासाची कामेही निवडणुकीनंतर हाती घेण्यात येतील, असे गडकरी म्हणाले.कोकणातील सव्वालाख बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी जेएनपीटीचा विकासही करण्यात येणार असून, जलवाहतुकीच्या विकासाकडेही लक्ष देण्यात येणार आहे. कोकणचा विकास करण्यासाठी विकासाची दूरदृष्टी असणारा नेता हवा असल्याने अनंत गीते यांना मतदान करा, असेही गडकरी यांनी आवाहन केले. युतीचे उमेदवार अनंत गीते यांनी आपल्या भाषणात राजकारणामुळे रायगडमधील गोरेगाव अर्बन बँक, रोह्यातील रोहा अष्टमी अर्बन बँक आणि पेणमधील पेण अर्बन बँक बुडाल्या, असे सांगितले.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नागोठणे ते अलिबाग या दरम्यानच्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी एमआयडीसी संचालक मंडळाला प्रस्ताव करून घेतला असून, त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केल्याचेही सांगितले.धेरंड येथे टाटाने भूसंपादन केले होते. तेथे वीज प्रकल्प उभा न राहिल्याने ही जमीन शासन परत ताब्यात घेऊन तेथे पेपर मील उभारून सहा हजार बेरोजगारांना रोजगार दिला जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. या वेळी शिवसेनानेते विजय कवळे, भाजप आमदार प्रवीण दरेकर, रायगड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनीही आपले विचार मांडले.शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तरकाँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने त्यांच्या काळात ७० कोटींची विमाने घेतली. त्यात काय घोटाळा झाला हे माहीत नाही; परंतु याच निधीने देशातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविला असता, तर पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही सुगीचे दिवस आले असते, अशी टीका त्यांनी केली. दहशतवादांसमोर गुडघे टेकणारा पंतप्रधान हवा की त्याला उखडून फेकणारा पंतप्रधान हवा, हे मतदारांनी ठरवायचे आहे, असेही गडकरी म्हणाले. शरद पवार यांनी अलिबागच्या सभेत, अनंत गीते हे संसदेत आवाज न उठविता फक्त जांभई देण्याचे काम करतात, त्याचा गडकरी यांनी समाचार घेताना, पवारसाहेब खोट बोलतात असे सांगतानाच अनंत गीते कोकणातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी मला तब्बल २५ वेळा भेटल्याचे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडNitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस