शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

क्रेटा कारची स्कुटीला धडक! पती-पत्नी दोघांचाही मृत्यू; ५ वर्षीय मुलगी गंभीर, आरोपीचे पलायन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 19:16 IST

शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एक क्रेटा कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. 

मधुकर ठाकूर 

उरण: क्रेटा कारचालकाने एका एक्सेस स्कुटीला दिलेल्या जोरदार धडकेत पती -पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.उरण रेल्वे स्थानकासमोर असलेल्या प्रवेशद्वाराला लागुनच असलेल्या रस्त्यावर शनिवारी रात्री हा भीषण अपघात घडला आहे. याप्रकरणातील वाहन चालकाने रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांला मारहाण, शिवीगाळ करून घटना स्थळावरुन पोबारा केला आहे. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एक क्रेटा कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. 

या धडकेत स्कुटीवर असलेले पवित्र बराल (४०), पत्नी रश्मीता बराल (३४) आणि  पाच वर्षीय मुलगी परी असे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते.जखमी पती पवित्र बराल यांचे येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात तर पत्नी रश्मीता बराल यांचे एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या पाच वर्षीय परीला ठिकाणी ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे.बेलापुर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान उरण रेल्वे स्थानकाबाहेरच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताचा आवाज ऐकून कामावर असलेले रेल्वे पोलिस कर्मचारी अतुल राजेंद्र चौहान हे प्रवेशद्वारावर धावून आले होते.भीषण अपघाताची दृश्य पाहून त्यांनाही दरदरून घाम फुटला होता.

मात्र क्रेटा कारचा चालक जय चंद्रहास घरत रा.म्हातवली याने रस्त्यावर निपचित पडलेल्या तीघांना हटविण्यासाठी या रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून मारहाण केली. शिवीगाळ केली आणि घटना स्थळावरुन पोबारा केला.याप्रकरणी रेल्वे पोलिस कर्मचारी अतुल राजेंद्र चौहान यांनी उरण पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरणAccidentअपघातDeathमृत्यू