शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

coronavirus: कोरोनामुळे पावसाळी पर्यटनावर पाणी, सुरक्षिततेसाठी सर्व पर्यटनस्थळे बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 11:58 PM

या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी मुंबईकरांकडून सर्वाधिक पसंती पनवेलला मिळत असते. कर्नाळा किल्ला, अभयारण्य, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड, इरशाळगड व या परिसरातील निसर्गासह धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. परंतु, या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे.राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रायगडचा अग्रक्रमांक लागतो. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, नैसर्गिक पर्यटनस्थळांचे वैभव या परिसराला लाभले आहे. पावसाळी पर्यटनासाठी जिल्ह्यात सर्वाधिक पसंती पनवेल तालुक्याला लाभत असते. पावसाळा सुरू झाला की कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होते. जूनपासून पावसाळा संपेपर्यंत अभयारण्य व कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी प्रत्येक महिन्याला १0 ते १५ हजार पर्यटक भेट देत असतात. येथून काही अंतरावर असणा-या इरशाळगड, कलावंतीन दुर्ग व प्रबळगड किल्ल्यांवरही प्रत्येक आठवड्यात सरासरी २ ते ५ हजार पर्यटक भेट देत असतात. गाढेश्वर धरण परिसर, मोरबे धरण, पांडवकडा व या डोंगररांगांतील इतर धबधबे पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड परिसरातील स्थानिक गावांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. प्रत्येक घरातील किमान एकतरी व्यक्ती हॉटेल, चहाची टपरी व इतर व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहे. प्रबळगडमाची या संपूर्ण गावचा रोजगार पर्यटनावर अवलंबून आहे. कर्नाळा अभयारण्यातही बचतगटाच्या माध्यमातून हॉटेल चालविण्यात येत आहे. वनव्यवस्थापन समितीमध्येही स्थानिकांना नोकरी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवली असल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.काजव्यांचा हंगामही गेला : कलावंतीन दुर्ग व प्रबळगडाला वर्षभर पर्यटक भेट देत असतात. कलावंतीन सुळका सर करण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येत असतात. पावसाळा सुरू झाला की या परिसरात रात्री लाखो काजवे दिसू लागतात. येथील वृक्षांवर चांदण्यांप्रमाणे काजवे चमकत असतात. ते मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मुक्कामासाठी प्रबळगड माचीवर जात असतात. या वर्षी तो हंगामही वाया गेला आहे.कर्नाळा परिसरातही पसरली शांततापावसाळ्यात सर्वाधिक गर्दी कर्नाळा अभयारण्य व कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी होते. १२ चौरस किलोमीटर परिसरावरील या अभयारण्यात ६४२ प्रकारचे वृक्ष, १३४ प्रजातींचे स्थानिक व ३४ प्रजातींचे विदेशी पक्षी पाहावयास मिळतात.गडावरील ऐतिहासिक अवशेष व वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतु कोरोनामुळे साडेतीन महिने या परिसरातही शांतता पसरली आहे.

कर्नाळा अभयारण्यात गतवर्षी (२०१९) आलेल्या पर्यटकांची आकडेवारीमार्च ७,५५१एप्रिल ३,८९३मे ३,९३८जून १0,२८१कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कर्नाळा अभयारण्य व किल्ला परिसरात पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यानंतरच पर्यटकांना परवानगी दिली जाणार आहे. सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळाकलावंतीन दुर्ग व प्रबळगड परिसर प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाला आहे. पर्यटन उद्योगावर येथील अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. परंतु सुरक्षेला प्राधान्य देत सद्य:स्थितीमध्ये पर्यटकांना या परिसरात मनाई केली आहे.- एन. एन. कुप्ते, साहाय्यक वनसंरक्षक, पनवेल.गवळीदेव धबधब्यावरही बंदी : नवी मुंबईमधील गवळीदेव धबधबा मागील काही वर्षांत पर्यटकांना आकर्षित करीत आहे. मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातूनही पर्यटक येथे येतात. या वर्षी गवळीदेव धबधब्यावरही सुरक्षेसाठी पर्यटकांना मनाई केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडtourismपर्यटन