शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

coronavirus: विलगीकरण कक्षासाठी परवानगी आवश्यक, उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 04:00 IST

कोरोनाच्या संशयित रुग्णांना एम-पश्चिम प्रभागात अन्यत्र कोठेही विलगीकरण कक्ष उपलब्ध झाले नाहीत तरच माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली.

मुंबई :माहुल येथे प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांचा वापर कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष म्हणून करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिले.कोरोनाच्या संशयित रुग्णांना एम-पश्चिम प्रभागात अन्यत्र कोठेही विलगीकरण कक्ष उपलब्ध झाले नाहीत तरच माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली. प्रकल्पग्रस्त कॉलनीमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी व विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा प्रशासनाच्या निर्णयाला एका अंडरट्रायलची आई शारदा तेवर आणि घर बचाओ घर बनाओ आंदोलन या एनजीओने जनहित याचिका दाखल करून उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.कोरोनाच्या रुग्णांवर माहुल येथील पीएपी कॉलनीमध्ये उपचार करणे अयोग्य आहे. या ठिकाणी आधीच आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झालेल्या आहेत. येथे श्वसनाचे विकार अधिक आहेत आणि अशा ठिकाणी विलगीकरण कक्षात कोरोनाच्या रुग्णांना ठेवल्यास त्यांच्या प्रकृतीवर उलटा परिणाम होऊ शकतो, असे याचिकेत म्हटले आहे.कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची कमतरता असते. त्यामुळे श्वसनाचे विकार जडू शकतात. कोरोना संशयित रुग्णांना माहुलमध्ये ठेवल्यास संपूर्ण उद्देश निष्फळ ठरेल आणि रुग्णांना श्वसनासंबंधी विकार होऊ शकतात आणि हे अधिक घातक ठरेल, असे याचिकेत म्हटले आहे.यापूर्वी माहुलमध्ये पीएपी कॉलनीमध्ये जे राहण्यास गेले आहेत त्यांना दमा व अन्य श्वसनाचे विकार जडले आहेत, असा दावा याचिकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे.या याचिकेवर महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. माहुल असलेल्या एम-प्रभागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २,९४६ इतकी होण्याची शक्यता आहे. तसेच झोपडपट्टीच्या भागात कोरोना रुग्णांची संख्या ७० टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक कोरोना रुग्णाच्या संपर्कात १० लोक आले असतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. या हिशेबाने ३० हजार लोकांना विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. जागेची कमतरता असल्याने महापालिकेने माहुलच्या तीन इमारती वापरण्याचा निर्णय घेतला, असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.बाधितांच्या राहण्याची व्यवस्थामाहुल येथील एव्हरस्माइल कॉम्प्लेक्समध्ये ११०० अतिगंभीर आणि कमी गंभीर असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. मात्र अन्य कोठे जागा उपलब्ध झाली नाही तरच येथे लोकांना ठेवण्यात येणार आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.त्यावर माहुल येथील पीएपी सदनिकांचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट