शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News: गणेशोत्सवासाठी कोरोना योद्धे सज्ज; गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:52 PM

अलिबाग नगरपरिषद, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणेची तयारी

- निखिल म्हात्रे अलिबाग : अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असली, तरी गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना योद्धे सज्ज झाले आहेत. लाडक्या बाप्पांच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी गणरायांच्या विसर्जनाचे नियोजन तयार करण्यात आले आहे. अलिबाग नगरपरिषद, अलिबाग महसूल प्रशासन आणि अलिबाग पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशीच विसर्जनासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.समुद्रकिनारी बाप्पाची मूर्ती प्रशासनाच्या हवाली करून गणेशभक्तांना माघारी फिरावे लागणार असून, गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची जबाबदारी अलिबाग नगरपरिषद कर्मचारी आणि लाइफ गार्ड यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव हा कोरोना महामारीच्या कचाट्यात सापडला आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानेच आदर्श नियमावली जारी केली आहे. यामध्ये घरगुती गणेशमूर्ती २ फूट आणि सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट उंचीची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. गणेश विसर्जनासाठी अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी महेश चौधरी आणि अलिबाग पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांनी लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा करून नियोजन केले आहे.अलिबाग शहर आणि परिसरातून विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचे अलिबाग पोस्ट कार्यालयाच्या नजीक रस्त्यावर स्क्रीनिंग केले जाणार आहे. स्क्रीनिंग केल्यानंतर घरगुती गणेशासोबत २ जण आणि खासगी गणेशासोबत ५ गणेशभक्तांना तपासणीनंतर विसर्जनाच्या मार्गावर जाण्याची मुभा देण्यात येणार आहे. क्रीडाभवनच्या समुद्र किनाºयालगतच्या कॉर्नरवर दुसरा तपासणी नाका असणार आहे अशी माहिती अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.घरपोच गणेश विसर्जन सेवसेसाठी चर्चा सुरूक्रीडाभवनच्या कॉर्नरला निर्माल्य जमा करणाºया चार काउंटर ठेवण्यात येणार आहेत. गणेश विसर्जनासाठीही चार काउंटर उभारण्यात येणार आहेत. गणेशमूर्तीची बैठक व्यवस्था आणि रेती तेथेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.गणेशाचे विसर्जन करण्याची जबाबदारी अलिबाग नगरपरिषद कर्मचारी आणि लाइफ गार्ड यांच्यावर असणार आहे. हातगाडीने किनाºयापर्यंत आणि तेथून बोटीने समुद्रात नेऊन गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.गणेशभक्तांनी विसर्जनापूर्वीची महाआरती घरून करून यावे. ज्यांना गणेश विसर्जन करण्यासाठी घरपोच सेवा आवश्यक असणार आहे, त्या नागरिकांनी मागणी केली तर घरपोच गणेश विसर्जन सेवा पुरविण्याचे नियोजन करत येईल का, अशी चर्चा सुरू असल्याचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.एकदिशा मार्गाचे नियोजन-कोल्हेगणेश विसर्जन करण्यासाठी मिरवणूक काढण्यावर बंधने आणण्यात आली आहेत. यामुळे गर्दी न करता गणेशभक्तांना समुद्रकिनाºयावर विसर्जन करण्यासाठी येताना प्रशासनाला सहकार्य करावे लागणार आहे. गणेशभक्त अलिबाग शहरातून थेट किनाºयाच्या दिशेने येतील, यासाठी एकदिशा मार्ग नियोजित करण्यात येणार आहे. अंतिम टप्प्यात गणेशभक्तांनी गणेश विसर्जन करण्यासाठी मूर्ती सुपुर्द केल्यानंतर, एकदिशा मार्गानेच बाहेर पडावे, असे आवाहन अलिबाग पोलीस निरीक्षक के.डी. कोल्हे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस