शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

CoronaVirus News : महिलांपेक्षा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:29 IST

० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे.

- आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत पुरुषांची कोरोना चाचणीची संख्या महिलांच्या तुलनेत अधिक करण्यात आली आहे. त्यातील ७२ टक्के पुरुषांचा तर २८ टक्के महिलांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.० ते १७ वयोगटांतील ८ टक्के नागरिक हे कोरोनानेबाधित होत आहेत, तर २६ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोनाचा घट्ट विळखा पडत आहे. ६० पेक्षा अधिक वयोगटांतील १२ टक्के नागरिक कोरोनाने त्रस्त आहेत. त्यातील ४९ टक्के नागरिकांना मृत्यूने कवटाळले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने शहरी भागातून आपले हातपाय ग्रामीण भागाकडे पसरवले आहेत. ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे असल्याने, या ठिकाणी जास्त प्रमाणात वर्दळ सुरू आहे. अनलॉकनंतर त्यामध्ये अधिक भर पडली आहे. पुरुष हे कामानिमित्त मोठ्या संख्येने बाहेर पडतात. ६५ टक्के पुरुषांची तर ३५ टक्के महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये दोन्ही घटकांना १०० टक्के कोरोना झाल्याचे दिसून येते. प्रशासनाने एक लाख १६ हजार ६३७ कोरोना चाचणीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, ही आकडेवारी आहे.६५ टक्क्यांपैकी ६६ टक्के पुरुषांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले, ३४ टक्के रुग्णांनी घरीच उपचार केले अथवा त्यांना त्रास झाला नसावा. ३५ टक्के महिलांपैकी तर ३४ टक्के महिलांनी रुग्णालयात उपचारास पसंती दिली. येथेही ६६ महिलांना लक्षणे नसावीत, अथवा त्या घरीत बऱ्या झाल्या असण्याची शक्यता आहे. ६६ पैकी ७२ टक्के पुरुष रुग्णांचा, ३४ पैकी २८ टक्के महिला रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

० ते १७ वयोगटांतील ९९ टक्के रु ग्ण झाले बरे- ० ते १७ वयोगटांतील ७ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, कोरोना होण्याचे प्रमाण हे ८ टक्के आले, तर ९२ टक्के नागरिकांना कोरोना नसल्याचे सिद्ध झाले. ७ टक्के कोरोनाबाधितांना रुग्णालयात उपचासाठी दाखल केले असता, ९९ टक्के रुग्ण बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत, तर १ टक्का रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.- १८ ते २५ वयोगटांतील १२ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, १० टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचे दिसून येते, तर ९० टक्के रिपोर्ट निगेटिव्ह आले. १० टक्क्यांपैकी पैकी ९ टक्के कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केले असता, ९९ रुग्ण बरे झाले तर, १ टक्का मृतांचे प्रमाण आहे.- २६ ते ४४ वयोगटांतील ४७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ४२ टक्के नागरिक कोरोनाबधित आढळले, तर ५८ नागरिकांचे रिपोर्ट नगेटिव्ह आले. ४२ पैकी ३९ टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर ६१ नागरिकांना दाखल केले नाही. उपचारानंतर ३८ टक्के नागरिकांना मृत्यूने कवटाळले, ६२ रुग्ण बरे झाले.- ४५ ते ६० वयोगटांतील २५ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. २८ टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर ७२ रिपोर्ट निगेटिव्ह आले. २९ टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले असता, मृत होण्याचे प्रमाण ३८ टक्के, बरे होण्याचे प्रमाण हे ६२ टक्के आहे.- ६० टक्के आणि त्याच्या पुढील वयोगटांतील ९ टक्के नागरिकांची कोरोना चाचणी केली असता, १२ टक्के नागरिकांची कोराना चाचणी पॉझिटिव्ह आली, तर ८८ नागरिकांची निगेटिव्ह आली. पैकी १५ टक्के नागरिकांना रुग्णालयात दाखल केले असता, तब्बल ४९ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस