coronavirus: आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता, रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी उपचार केंद्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:50 AM2021-04-03T01:50:02+5:302021-04-03T01:53:08+5:30

coronavirus in Raigad : जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक होते. मात्र ती न केल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

coronavirus: Lack of manpower in health department, treatment centers started at 16 places in Raigad district | coronavirus: आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता, रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी उपचार केंद्र सुरू

coronavirus: आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता, रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी उपचार केंद्र सुरू

googlenewsNext

- निखिल म्हात्रे
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या भरणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक होते. मात्र ती न केल्याने आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय प्राथमिक केंद्र महाड, प्राथमिक केंद्र कशेळे अशा १६ ठिकाणी उपचार केंद्रे सुरू केली आहेत. उर्वरित केंद्रेही लवकरच सुरू केली जाणार आहेत.
नवीन केंद्रे सुरू केल्यानंतर तेथे तज्ज्ञ डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्ण कमी झाल्यानंतर कामावरून कमी केले होते. आता पुन्हा नवीन कर्मचारी वेळेत उपलब्ध करण्यासाठी आरोग्य प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
जिल्ह्यात ३३९ आरोग्य कर्मचारी भरती करण्याची आवश्यकता आहे. वेळेत नवीन कर्मचारी मिळाले नाहीत तर आहेत त्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे.

आरोग्य विभागात
आवश्यक मनुष्यबळ
पद     कर्मचारी
वैद्यकशास्त्र तज्ज्ञ(एमडी)     १०
मेडिकल मायक्रोबायोलाॅजिस्ट     १
इंटेन्सिव्हिस्ट     ८
एमबीबीएस     १५
बीएएमएस     १७
बीएचएमएस     १७
बीयूएमएस     ०
स्टाफ नर्स     ५०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ     ६
कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ     १०
एनएम     ४०
बेडसाईड सहायक     ४०

रिक्त पदे  लवकरच भरणार 
कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांवर पडत असलेला ताण पाहता जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा मुख्य कार्यकारी 
अधिकारी किरण पाटील 
यांनी जिल्हा रुग्णालयाने जिल्हास्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे रिक्त पदे ही लवकरात लवकर भरण्यात येतील.
- डॉ. सुहास माने, 
जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: coronavirus: Lack of manpower in health department, treatment centers started at 16 places in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.