शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: विद्यार्थ्यांविना शाळा पडल्या ओसाड, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकांकडूनही सुरू करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 00:46 IST

राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत.

कळंबोली - शाळेसाठी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे. या कोरोना महामारीमुळे शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांविना शाळा ओसाड दिसू लागल्या आहेत. दरवर्षी शाळा सुरू झाल्या की, शाळा आणि विद्यार्थी हे आजपर्यंतचे समीकरण होते, परंतु यंदा कोरोनामुळे शाळा सुरू करण्यास शासनाची द्विधावस्था निर्माण झाली आहे, तर पालकांनीही या परिस्थितीत पाल्यास शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे.दरवर्षी १५ जूनला नियमित शाळा सुरू व्हायची. शिक्षकांंकडून पहिलीसाठी विद्यार्थ्यांना शोधून शाळेत प्रवेश दिला जायचा. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन तयार राहत असत. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश नवीन पुस्तके घेऊन शाळेत पहिले पाऊल टाकण्याचा आनंद वेगळाच असायचा. इतर वर्गातील विद्यार्थी परीक्षा देऊन पुढील वर्गात गेल्याने पहिल्या दिवशी आनंदी वातावरण निर्माण व्हायचे. मात्र, यंदा परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, खाऊ दिला जातो. त्यामुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी सणासारखा असतो.मात्र, यंदा या सणावर कोरोनाने विरजण टाकले आहे. राज्यात वाढत असलेला कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात पनवेल तालुक्यात कोरोना संसर्ग रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील शाळा अद्याप बंद आहेत. शासनाचीही शाळा सुरू करण्याबाबत द्विधावस्था निर्माण झाली आहे. जुलैपासून शाळा सुरू होणार होत्या, परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून शाळा अद्याप तरी सुरू करणे जिकरीचे बनले आहे. त्यास पालकांनीही विरोध दर्शविला आहे.ऑनलाइन अभ्यासक्रमावर भरकोरोनाच्या महामारीमुळे पनवेल महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील शाळा बंद आहेत. त्यामुळे पनवेल तालुक्यातील २४८ जिल्हा परिषद शाळांनी आॅनलाइन अभ्यासक्रम सुरुवात केली आहे.शाळेतील वर्गशिक्षकाकडून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जात आहे, तर पालकाकडे अँड्रॉइड मोबाइल नसेल, तर त्यांना फोनद्वारे अभ्यास दिला जात आहे.यामुळे विद्यार्थी अभ्यासात रमत आहेत. शासनाकडून पुढील आदेश आल्यानंतर शाळा सुरू होणार असल्याचे मत गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थीRaigadरायगड