शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Coronavirus : महाडमधील सेंटरमध्ये चार जण निगराणीखाली, अफवा न पसरवण्याचे प्रशासनाचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 2:10 AM

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाइन सेंटर उभे केले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

दासगाव  - एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान माजले आहे. यामुळे महाडसारख्या ग्रामीण भागातदेखील प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनटाइन सेंटर उभे केले आहे. या ठिकाणी देशात आणि देशाबाहेर पर्यटनासाठी जाऊन आलेल्या चार जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मात्र कोरोनाच्या अवास्तव प्रचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अफवा पसरवू नका, असे आवाहन प्रशासनाने करून घाबरण्याचे कारण नसल्याचेदेखील स्पष्ट केले आहे.कोरोना व्हायरसमुळे देशातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासन विविध मार्गांनी जनजागृती करत आहे. महाड आरोग्य विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनो संशयितांसाठी कोरोनटाइन सेंटर उभे करण्यात येत आहे. डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली १० खाटांच्या या सेंटरमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांमधील संशयित रुग्णांची तपासणी, प्राथमिक औषधोपचार आणि जेवणासहित राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळल्यास त्याला तत्काळ मुंबई किंवा पुणे येथे स्थलांतर करण्यात येईल. महाड शहराच्या बाहेर वरंध प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे सेंटर सुरू करण्यात होते. मात्र तेथील नागरिकांनी याला विरोध दर्शवल्यामुळे हे सेंटर आता राष्ट्रीय स्मारकात सुरू होत आहे. या कोरोनटाइन सेंटरमध्ये देशात आणि देशाबाहेर फिरण्यास गेलेल्या चार जणांना आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्याच प्रकारचा त्रास नसला तरी खबरदारी म्हणून पुढील काही दिवस निगराणीखाली ठेवले जाणार आहे, अशी माहिती डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहननागरिकांनी अफवा न पसरवता खात्री आणि काही शंका असल्यास वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप ८९७५५२२६६७, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आय.यू. बिरादार ९६०४२२१०२४ वर संपर्क साधण्याचे आवाहनदेखील केले.महाडमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांची यादी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सध्या केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तयारी केली जात आहे. याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शिवाय अफवादेखील पसरवल्या जाऊ नये.- डॉ. भास्कर जगताप,वैद्यकीय अधीक्षक,महाडपेणमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासन सज्जपेण : पेणमध्ये विभागीय महसूल अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी कोरोना विषाणूचा फैलाव प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयीन अधिकाऱ्यांची तातडीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचाºयांना कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजनांवर विचार विनिमय व चर्चा करण्यात आली.जगातील कोरोना विषाणूंचा झपाट्याने झालेला संसर्ग पाहता शासनाकडून आदेश पारीत करण्यात आले आहेत. पेण बाजारात शुकशुकाट आहे. शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून, आठवडा बाजारावर बंदी घातली आहे. याशिवाय जलतरण तलावही बंद ठेवण्याचे आदेश पेण पालिका मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिले आहेत. कोरोना जनजागृतीसाठी पालिकेने होर्डिंग्ज, बॅनर लावले आहेत. दंवडी आदीद्वारे जनजागृती केली जात आहे. प्रशासनाची जनजागृती मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड