शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

CoronaVirus: पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रायगडमधील कोरोना रुग्णांची संख्या ४२ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 03:14 IST

पोलादपूरमधील महिलेचा मृत्यू; आतापर्यंत जिल्ह्यात दोन मृत्यू

अलिबाग/श्रीवर्धन/पोलादपूर : रायगड जिल्ह्यात रविवारी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर शनिवारी रात्री पोलादपूरमधील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या दोन झाली आहे. त्यामुळे रायगडमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ झाली आहे.पोलादपूरला प्रभातनगर पश्चिम येथील वृध्द जोडप्यापैकी महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलविले होते. त्या महिलेचा शनिवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या महाड, पोलादपूर मधील २६ जणांना होम क्वारंटाईन केले आहे.रविवारी पनवेल ग्रामीणमधील विचुंबे गावतील एकाचा रूग्णांमध्ये सामावेश असून ती व्यक्ती परराज्यातून आलेली आहे. ते बीपीटीमध्ये कामाला होते. श्रीवर्धनमधील चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत. दोन दिवसापूर्वी श्रीवर्धनमध्ये रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या नातेवाईकांसह त्याच्या घराजवळ राहणाऱ्या २८ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. बाकी २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित व्यक्तींपैकी १० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते ते निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र पुन्हा दुसऱ्यांदा रविवारी या १० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले तर त्यांना घरी पाठवण्यात येण्याबाबत डॉक्टर योग्य निर्णय घेतील.श्रीवर्धनमधील जनतेने परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन कुणीही विनाकारण घराच्या बाहेर जाऊ नये तसेच कोणतेही मदत हवी असेल तर प्रशासन त्यास तत्काळ मदत करेल. मात्र जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे.- अमित शेडगे, प्रांताधिकारी श्रीवर्धनश्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते येथील रुग्णाच्या घराच्या व्यक्तीने खाजगी रु ग्णालयात जाण्याऐवजी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात संबधित व्यक्तीस दाखल केले असते तर आज त्यांच्या घरातील इतर व्यक्तींचे अहवार कोरोना पॉझिटीव्ह आले नसते. मात्र आज ही अनेक व्यक्ती श्रीवर्धनमध्ये आल्याचे सांगत नाहीत किंबहुना जाणीवपूर्वक माहिती प्रशासनापासून लपवून ठेवतात यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू शकतो अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या